इंधन दरवाढ मागे घ्या...मागणीसाठी काँग्रेस्चे निवेदन...निवेदन द्यायला भलती गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:03 PM2020-06-25T16:03:00+5:302020-06-25T16:03:51+5:30
कर्जत - इंधन दरवाढ मागे घ्या व गोपीचंद पडळकरवर गुन्हा दाखल करा... ही मागणी करण्यासाठी कर्जत तालुका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी तहसीलदार व प्रांताधिकाºयांना निवेदन दिले. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनच्या नियमांचे कुठेही पालन होताना दिसले नाही. विशेष म्हणजे एवढ्या गर्दीत तहसीलदारांनीही निवेदन स्वीकारले.

कर्जत तालुका काँग्रेस आय व कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज प्रशासनाला वेगवेगळी निवेदने देण्यात आली. कर्जत तालुका काँग्रेस आय च्या वतीने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या नेतृत्वाखाली कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना पेट्रोल व डिझेलची झालेली दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. मात्र आपल्या देशातील केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल यांच्या किमती कमी करण्यापेक्षा यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या गोष्टीचा कर्जत तालुका काँग्रेस आयच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या बाबत वादग्रस्त विधान केले आहे. याबाबत जाहीर माफी मागावी. तसे झाले नाही तर कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.