सराफांची संपातून माघार
By Admin | Published: April 26, 2016 11:14 PM2016-04-26T23:14:54+5:302016-04-26T23:24:31+5:30
अहमदनगर : केंद्र सरकारने अबकारी कराबाबत कुठलीही तडजोड न केल्याने सराफ संघटनेने पुकारलेल्या तीन दिवसीय बंदमधून नगरमधील बहुतांशी सराफांनी दुसऱ्याच दिवशी माघार घेतली़
अहमदनगर : केंद्र सरकारने अबकारी कराबाबत कुठलीही तडजोड न केल्याने सराफ संघटनेने पुकारलेल्या तीन दिवसीय बंदमधून नगरमधील बहुतांशी सराफांनी दुसऱ्याच दिवशी माघार घेतली़
सराफ व्यावसायिकांसाठी लग्नसराई ही मोठी संधी असते़ यंदा मात्र, लग्नसराईच्या काळात तब्बल ४२ दिवस दुकाने बंद राहिल्याने सराफांचे मोठे नुकसान झाले़ आता एप्रिल महिन्याच्या अखेर लग्नसराई संपत आहे़ पुढे मुहूर्त नसल्याने येते चार दिवसच व्यवसायाची चांगली संधी असल्याने बहुतांशी सराफांनी मंगळवारी दुकाने उघडली़ सरकारने सराफ व्यावसायिकांवर लावलेल्या अबकारी कराच्या निषेधार्थ देशातील सराफ -सुवर्णकार व्यावसायिकांनी १ मार्चपासून देशव्यापी संप पुकारला होता. सरकारने यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने दि. १३ एप्रिल रोजी हा संप तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. सरकारने मात्र, अबकारी कायद्याबाबत कोणतीही तडजोड केली नसल्याने सोमवारपासून पुन्हा तीन दिवसांचा राष्ट्रीय बंद करण्याचे आवाहन संघटनेने केले होते. २७ एप्रिलपर्यंत हा बंद राहणार होता. नगरच्या सराफांनी मात्र, एक दिवस संप पाळून दुकाने उघडली़
(प्रतिनिधी)
दीड महिन्यांचा संप करूनही केंद्र सरकारने सराफांच्या मागण्या मान्य न केल्याने संघटनेने पुन्हा तीन दिवसांचा संप पुकारला आहे़ हा संप २७ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे़ नगरमधील मात्र, काही सराफांनी आपली दुकाने उघडून व्यवसाय केला़ हे खेदजनक आहे़ ही लढाई संघटनेची नसून सर्वच सराफ व्यावसायिकांची आहे़ त्यामुळे सराफांनी संघटनेला साथ देणे गरजेचे आहे़ -सुभाष मुथा, राज्य उपाध्यक्ष, सराफ संघटना