प्रक्रिया उद्योगाशिवाय शेतीला भविष्य नाही; उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 05:39 PM2020-06-19T17:39:45+5:302020-06-19T17:41:31+5:30
प्रक्रिया उद्योगाशिवाय शेतीला भविष्य नाही. प्रत्येक तालुक्यात मूल्यवर्धनाची साखळी तयार होणे गरजेचे आहे. म्हणून तरुण उद्योजकांनी शहरी भागात न जाता ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी मोठी संधी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग, खाणकाम मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
राहुरी : प्रत्येक गावात कृषी प्रक्रिया उद्योग सुरु झाल्यास नुकसान कमी होऊन शेतीमालाला चांगला भाव मिळेल. प्रक्रिया उद्योगाशिवाय शेतीला भविष्य नाही. प्रत्येक तालुक्यात मूल्यवर्धनाची साखळी तयार होणे गरजेचे आहे. म्हणून तरुण उद्योजकांनी शहरी भागात न जाता ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी मोठी संधी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग, खाणकाम मंत्रीसुभाष देसाई यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील स्मार्ट अन्न प्रक्रियाचे प्रगत तंत्रज्ञानावरील दोन आठवड्याचे आॅनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा होते.
देसाई म्हणाले, राज्यात भाजीपाला तसेच फळांचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र सरकारने राज्यात आठ मेगा फूडपार्क तसेच ६०० पेक्षा जास्त मार्केट पार्क सुरु केले आहेत. महाराष्ट्रात शेतमालाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या सोई सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. यामध्ये कृषी क्षेत्रातील नवीन उद्योजकांना शेतमाल प्रक्रिया उद्योगांमध्ये खूप मोठा वाव आहे, असेही देसाई म्हणाले.