मळणी यंंत्रात साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:39 AM2021-02-28T04:39:32+5:302021-02-28T04:39:32+5:30

जामखेड : काल्हेवाडी, साकत (ता.जामखेड) येथे ज्वारीची मळणी करताना साडीचा पदर मळणी यंत्रात अडकून एका महिलेचा मृत्यू झाला. ही ...

Woman dies after sari gets stuck in threshing machine | मळणी यंंत्रात साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यू

मळणी यंंत्रात साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यू

जामखेड : काल्हेवाडी, साकत (ता.जामखेड) येथे ज्वारीची मळणी करताना साडीचा पदर मळणी यंत्रात अडकून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

सिंधूबाई बजरंग कोल्हे (वय ४२, रा.कोल्हेवाडी, साकत, ता.जामखेड) असे मृत महिलेचे नाव आहे.

साकत परिसरात सध्या सर्वत्र सुगीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कामासाठी मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊनच सुगीची कामे करावी लागत आहेत. कोल्हेवाडी येथे बजरंग कोल्हे यांच्या शेतात ज्वारीचे खळे सुरू होते. कुटुंबातील लोक मळणी यंत्रावर काम करत होते. खळे संपत आले असताना, मळणी यंत्राखाली पडलेले भुसकट काढण्यासाठी सिंधुबाई कोल्हे या प्रयत्न करत होत्या. त्यावेळी ट्रॅक्टर व मळणी यंत्र जोडलेल्या ठिकाणी सिंधुबाई यांच्या साडीचा पदर अडकला. काही कळायच्या आत साडीपाठोपाठ डोकेही मळणी यंत्रात अडकले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यामागे पती, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.

----

२७ सिंधुबाई कोल्हे

Web Title: Woman dies after sari gets stuck in threshing machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.