महिलेला कारावास

By Admin | Published: August 27, 2014 10:55 PM2014-08-27T22:55:01+5:302014-08-27T23:08:42+5:30

अहमदनगर : कार चालवून चौघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणात स्मिता दत्तात्रय देशमुख यांना न्यायदंडाधिकारी ए.पी. पाटील यांनी एक महिन्याची शिक्षा ठोठावली आहे.

Woman imprisonment | महिलेला कारावास

महिलेला कारावास

अहमदनगर : बेभानपणे कार चालवून चौघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणात स्मिता दत्तात्रय देशमुख (वय ४८,रा. गुलमोहोर रोड, सावेडी) यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.पी. पाटील यांनी एक महिन्याची शिक्षा आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
नगर-मनमाड रोडवरील कॉर्नरवर देशमुख या कार चालवित होत्या. त्यांनी आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर ती कार एका चहाच्या टपरीजवळ चहा पित बसलेल्यांच्या अंगावर जावून धडकली. यामध्ये चहा पिणारे तिघे जण जखमी झाले. त्यांना जखमी करून आणखी एका दुचाकीवर ही कार आदळली. सदरचा विचित्र अपघात १९ आॅक्टोबर २०१२ रोजी घडला होता. या प्रकरणी या अपघातातील जखमी प्रशांत जिंदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू होता. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मनोज जायभाये आणि अ‍ॅड. नितीन वाघ यांनी चार साक्षीदार तपासले. अपघातास कारणीभूत असल्याचा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून स्मिता देशमुख यांना दोन वेगवेगळ््या कलमांन्वये न्यायालयाने एक महिना शिक्षा आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)

Web Title: Woman imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.