अकोलेत महाजनादेश यात्रेवर महिलेने फेकली शाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 02:21 PM2019-09-13T14:21:41+5:302019-09-13T14:29:21+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अकोले येथे आली असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शाई फेकल्याचा प्रकार घडला.
अकोले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अकोले येथे आली असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शाई फेकल्याचा प्रकार घडला.
अकोले येथे सुगाव शिवारात रोकडोबा मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी महाजनादेश यात्रा आली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिशेने शाई फेकली. यापूर्वीही या महिलेने जालना येथे फडणवीस यांच्या सभेत गोंधळ घातला होता. या महिलेनेच पुन्हा अकोले येथे मुख्यमंत्र्यांवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला.
विरोधकांनी विधानसभेत विरोधपक्ष नेतपदाची खुर्ची टिकविण्यापुरते तरी राजकारण करावे, अशी खिल्ली उडवत जनता हेच भाजपा महायुतीच्या सरकारचे दैवत आहे. यामुळेच जनतेशी संवाद साधण्यासाठी ही महाजनादेश यात्रा सुरु
आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाजप सरकारने ३७० कमल रद्द करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतल्यानेच जम्मू-काश्मिरमध्ये तिरंग्याची शान अबाधित राहिली आहे. सामान्य शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ होईपर्यंत शेतकरी स्वाभिमान योजना सुरु राहणार आहे. आमच्या सरकारने २० हजार कोटी शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी दिले. त्यांनी फक्त १२ हजार कोटी रुपये दिले. ही तफावत लक्षात घेवून शेतकºयांचे खरे कैवारी कोण? हे तुम्ही लक्षात घ्या, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
लहामटे पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, भाजपचे जिल्हा परिषद डॉ.किरण लहामटे हे शुक्रवारी माजीमंत्री मधुकर पिचड यांची चौकशी करावी, या मागणीसाठी तहसील कचेरीसमोर लाक्षणिक उपोषणास बसले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.