समाजाला दिशा देण्याचे काम महिलांनी केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:19 AM2021-01-04T04:19:01+5:302021-01-04T04:19:01+5:30

नगर परिषदेच्या वतीने रविवारी (दि.३) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कोविड योद्धा सन्मान सोहळा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...

Women did the work of giving direction to the society | समाजाला दिशा देण्याचे काम महिलांनी केले

समाजाला दिशा देण्याचे काम महिलांनी केले

नगर परिषदेच्या वतीने रविवारी (दि.३) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कोविड योद्धा सन्मान सोहळा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, डॉ. शालिनी सचदेव या प्रमुख उपस्थित होत्या. उपनगराध्यक्ष कुंदन लहामगे, शमा शेख, सुहासिनी गुंजाळ, रूपाली औटी, मालती डाके, सुनंदा दिघे, सुमित्रा दिड्डी, मनिषा भळगट, किशोर पवार, राजेंद्र वाकचौरे, गजेंद्र अभंग, नुरमोहम्मद शेख, बाळासाहेब पवार, शैलेश कलंत्री, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदी उपस्थित होते. कोरोना काळात महत्वपूर्ण कामगिरी करणार्‍या १८८ महिला यात डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला.

तांबे म्हणाल्या, कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील महिला, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. शहरातील सफाई कामगार महिलांनी कोरोना काळात कोणतीही तक्रार न करता काम केले. नगरपालिकेच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेस यांनीही उत्तम काम केले आहे. कर्तव्य म्हणून त्यांचा सन्मान आज करतो आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्पा देशमुख, भरत गुंजाळ, उमेश ढोले, रमेश ताजणे, गौरव मंत्री यांनी परिश्रम घेतले.

___

फोटो ०३तांबे

ओळ : कोरोना काळात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या महिलांचा संगमनेर नगर परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Web Title: Women did the work of giving direction to the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.