बाबुर्डीत जमिनीच्या वादातून महिला सरपंचांना कुर्हाडीने मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 05:50 PM2020-11-16T17:50:12+5:302020-11-16T17:52:31+5:30
पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली. यात काठ्या,कुर्हाडीचा वापर करण्यात आल्याने सुभाष दिवटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
पळवे (जि. अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली. यात काठ्या,कुर्हाडीचा वापर करण्यात आल्याने सुभाष दिवटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत आशा सुभाष दिवटे यांनी सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यानुसार सहा जणांविरोधात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबुर्डी येथील गवळी-दिवटे यांच्यात अनेक वर्षांपासून जमीनीचा वाद आहे. ग्रामस्थांनी हा वाद बऱ्याच वेळा पंचकमिटी समोर ठेवला. मात्र वाद मिटू शकला नसल्याने त्यांचे रूपांतर रविवारी काठ्या कुर्हाडीने मारहाणीत झाले.
याबाबत सुपा पोलीस स्टेशन वरून मिळालेली माहिती अशी की, रविवार दि.१५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आशा दिवटे यांनी बांधावरील झाड का पेटवून दिले असे विचारले असता सहा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस त्यांच्या पतीस व सासू ठकूबाई मारुती दिवटे यांना काठी व कुर्हाडीने मारहाण करत जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली. यावरून बाळू विठोबा गवळी, संगीता बाळू गवळी, निलेश बाळू गवळी, महेश बाळू गवळी, रीना महेश गवळी, प्रियंका निलेश गवळी सर्व रा.बाबुर्डी ता.पारनेर या सहा जणांविरोधात गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिस निरीक्षक बळप नेमणूक पारनेर पोलीस स्टेशन (अतिरिक्त कार्यभार सुपा पोस्ट),
सहाय्यक पोलिस निरीक्षक कोसे, पोहे कॉन्स्टेबल आर. एस. पटेल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.
पोलिसांकडून दंडीलशाही
आरोपी यांनी मारहाण करण्याअगोदर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर आमच्या कुटुंबातील सदस्यांना कुर्हाडी ने मारहाण केली. यापूर्वी देखील सासूबाईंना मारहाण करण्यात आला आहे. आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता ते नातेवाईक आहेत.असे म्हणत आमच्यावर मोठ्या आवाजात बोलू लागले.घटना स्थळी जाऊन देखील कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही.तक्रारीची दखल न घेतल्यास जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहे.
- आशा दिवटे, माजी सरपंच बाबुर्डी.