तळीरामांची धुलाई करीत महिलांनी दारु दुकानाला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:40 PM2017-12-21T15:40:13+5:302017-12-21T15:42:18+5:30
कोतूळ येथे दारुबंदीसाठी महिलांनी एल्गार पुकारल्यानंतर गावात बंद केलेले दारु दुकाना शेतात सुरु करण्यात आले. महिलांना ही माहिती समजताच त्यांनी थेट हे दारु दुकान गाठून तेथे असलेल्या तळीरामांची यथेच्छ धुलाई केली आणि या परवानाधारक दारु दुकानालाही टाळे ठोकले.
कोतूळ : कोतूळ येथे दारुबंदीसाठी महिलांनी एल्गार पुकारल्यानंतर गावात बंद केलेले दारु दुकाना शेतात सुरु करण्यात आले. महिलांना ही माहिती समजताच त्यांनी थेट हे दारु दुकान गाठून तेथे असलेल्या तळीरामांची यथेच्छ धुलाई केली आणि या परवानाधारक दारु दुकानालाही टाळे ठोकले.
कोतूळ येथे दारुबंदीसाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. महिलांच्या या लढ्याला गावातील काही शिक्षित तरुणांनीही पाठिंबा देत गावातून दारु हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. गावात दारु विकण्यास महिलांनी मज्जाव केल्यामुळे गावातील एका परवानाधारक दारु विक्रेत्याने गावापासून काही अंतरावर साबळेवाडी परिसरातील शेतात हे दुकान थाटले. बुधवारी (दि. २०) हे दुकान सुरु झाले. याची माहिती मिळताच महिलांसह गावातील काही तरुणांनी थेट हे दुकान गाठले. त्यावेळी तेथे तळीरामांची मोठी गर्दी होती. महिलांनी या तळीरामांची धुलाई करीत या दारु दुकानाला टाळे ठोकले. दुकानातील देशी-विदेशी दारुच्या बाटल्या बाहेर आणून फोडल्या.