दारूबंदीसाठी महिला उतरल्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:20 AM2021-03-31T04:20:34+5:302021-03-31T04:20:34+5:30
तालुक्यातील सटवाई जवळका येथील महिला तळीरामाच्या त्रासाला कंटाळून गेल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी त्वरित दारूबंदी करण्यात यावी, यासाठी ...
तालुक्यातील सटवाई जवळका येथील महिला तळीरामाच्या त्रासाला कंटाळून गेल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी त्वरित दारूबंदी करण्यात यावी, यासाठी संघटित होऊन दारूबंदीच्या घोषणा देत, जवळका ग्रामपंचायतीवर आपला मोर्चा नेला. यावेळी सरपंच उषा माने, उपसरपंच वंदना संतोष वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब दळवी, बबरुवान वाळुंजकर कार्यालयात उपस्थित होते.
सरपंच माने यांनी निवेदन स्वीकारून मीटिंगमध्ये चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्यास आपण तीव्र आंदोलन करणार असल्याचा गंभीर इशारा यावेळी मोर्चा मधील महिलांनी दिला.
मोर्चामध्ये संगीता वाळुंजकर, नंदा बोराडे, पुष्पा कदम, सुनीता माने, मैना माने, मीरा माने, कुसुम वाळुंजकर, मीना वाळुंजकर, आशा कदम, सुजाता माने, सारिका साठे, शारदा वाळुंजकर, राजूबाई मंडलिक, आशा बनसोडे, सोजराबाई माने, पार्वती वाळुंजकर, मंदा मंडलिक, सुशीला बोराडे, पूजा माने, शोभा वाळुंजकर, कांताबाई यादव, गंधराबाई मंडलिक, छबा हडोळे, सोजरबाई बताशेसह अनेक महिला व नागरिक उपस्थित होते. या सर्व उपस्थित महिला व नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया देत दारूबंदीची मागणी केली.
फोटो - जामखेड दारू