लोकमत भवनमध्ये महिलांच्या गणेशोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 03:06 PM2019-09-02T15:06:07+5:302019-09-02T15:20:10+5:30

अहमदनगर येथील लोकमत भवनमध्ये ‘तिचा गणपती’ची प्रतिष्ठापना महिलांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या निनादात महिलांनी रिंगण केले.

Women's Ganeshotsav started in Ahmednagar Lokmat Bhawan | लोकमत भवनमध्ये महिलांच्या गणेशोत्सवाला प्रारंभ

लोकमत भवनमध्ये महिलांच्या गणेशोत्सवाला प्रारंभ

अहमदनगर : येथील लोकमत भवन मध्ये ‘तिचा गणपती’ची प्रतिष्ठापना महिलांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या निनादात महिलांनी रिंगण केले. गणपती बाप्पाच्या जयघोषाने लोकमतचा परिसर दुमदुमला.
शहरात सगळीकडे बाप्पांचे आगमन झाले आहे. लोकमत भवनमध्ये मात्र महिलांच्या हस्ते गणपती प्रतिष्ठापना करून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला आहे. लोकमत सखी मंचच्या विविध भागातील केंद्र प्रमुखांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी शाडू मातीची मूर्ती निवडण्यात आली.
लोकमत तीचा गणपती या अभिनव उपक्रमांतर्गत गणेशोत्सवाच्या माध्यमातून महिलांना सन्मान दिला जातो. याही वर्षी तिच्या हस्ते प्रतिष्ठापना करून महिलांना सन्मान देत स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला. महिलांच्या हस्तेच वाजत गाजत गणरायाचे आगमन लोकमत भवन परिसरात झाले. यावेळी महिलांनी फुगडी, रिंगण करून बाप्पांचे आगळेवेगळे स्वागत केले. गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लोकमतचे अधिकारी, कर्मचारी आणि सखी मंचच्या केंद्रप्रमुखांनी ढोल ताशांच्या तालावर नृत्य केले. लोकमत भवनमध्ये दररोज महिलांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात येणार आहे. लोकमतने महिलांच्या हस्ते प्रतिष्ठापना व आरती करून सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला आहे. यामुळे समाजासाठी काही तरी करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली, अशा प्र्रतिक्रया उपस्थित महिलांनी दिल्या.

Web Title: Women's Ganeshotsav started in Ahmednagar Lokmat Bhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.