निंबळक ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडामोर्चा
By Admin | Published: April 18, 2017 05:25 PM2017-04-18T17:25:35+5:302017-04-18T17:25:35+5:30
नगर तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येच्या गावाला मीटरपद्धतीने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रसिद्ध असलेल्या निंबळक गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला.
न ंबळक : नगर तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येच्या गावाला मीटरपद्धतीने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रसिद्ध असलेल्या निंबळक गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला. पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने मंगळवारी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेला. ग्रामपंचायत सदस्य मोनिका कोतकर, सुवर्णा कोतकर, सुमन मदने, सुभाष कोरडे, बी.डी. कोतकर, मुरलीधर कोतकर, साहेबराव मदने,अविनाश कोतकर,दत्तात्रय कोतकर,हरीश कळसे,संजय गायकवाड यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. मिसळ व उपसरपंच घनश्याम म्हस्के यांच्याकडे निवेदन देण्यात आले.नगर शहरापासून जवळच असलेल्या निंबळक गावात पाण्याचे तीव्र संकट ओढवले आहे. दहा ते बारा दिवसांतून एकदाच पाणी सुटत असल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत सुरु करावा, यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र तरीही पाणी वेळेवर सुटत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी गावातून फेरी काढली. पाणी वेळेवर का सुटत नाही, आम्ही पाणीपट्टी वेळेवर भरूनही अशी परिस्थिती का उद्भवते, अशा प्रश्नांचा महिलांनी ग्रामसेवक, उपसरपंच यांच्यावर भडीमार केला. पाण्याचे वितरणव्यवस्था समांतर नसल्यामुळे पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे लवकरच सर्वांना सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन ग्रामसेवक एस.व्ही.मिसाळ यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत ३२ हातपंप असून, त्यामधील फक्त चारच हातपंपाला पाणी आहे. हातपंप ग्रामपंचायतीने दुरुस्त केले. मात्र, पाण्याची पातळी खालावल्याने पाणी येत नसल्याचे उपसरपंच घनश्याम म्हस्के यांनी सांगितले.उन्हाळ््यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवत आहे. दहा ते बारा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. यामुळे महिलांची धावपळ होते. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा, आंदोलन तीव्र करण्यात येईल.-मोनिका कोतकर, ग्रामपंचायत सदस्य-लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून गावाला होणारा पाणीपुरवठा कमी आहे. चार दिवसांतून एक तास पाणी सोडले जाईल. गावात जवळपास १५७१ नळजोडणी व ३३ वॉल आहेत. एका नळजोडणीला ७० ते ८० कनेक्शन असल्याने सर्वाना पाणी जात नाही. एका नळजोडणीला ३० ते ४० कनेक्शन जोडण्यात येतील. जेणेकरून सर्वाना पाणी मिळेल. - एस.व्ही.मिसाळ, ग्रामसेवक