१२७ आदिवासी मुलांच्या जीवनात आणला शिक्षणाचा प्रकाश, अनंत झेंडे यांचे कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 01:01 PM2020-06-21T13:01:47+5:302020-06-21T13:02:02+5:30
रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यामध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम!
बाळासाहेब काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : महामानव बाबा आमटे यांच्या विचाराची शिदोरी घेऊन समाजसेवेच्या विश्वात रममाण झालेले श्रीगोंदा येथील अनंत अच्युतराव झेंडे हे १२७ आदिवासी मुलांचा सांभाळ करीत आहेत. त्यांचे राहणे, खाणेपिणे, शिक्षण ही सर्व जबाबदारी ते पार पाडत आहेत. महामानव बाबा आमटे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश आणला आहे.
अनंत झेंडे यांचे मुळगाव नगर- दौंड रस्त्यावरील चिखली होय. लहानपणापासून समाजसेवेची आवड. बारावीपर्यंतच शिक्षण घेतले. २००५ मध्ये ज्ञानदीप शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून काम सुरू केले. त्याअगोदर २००२ मध्ये भारतसेवक डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्याकडे श्रमसंस्काराचे धडे घेतले. आनंदवनमध्ये उन्हाळी शिबिरे केली. यामुळे समाजसेवा नसानसात भिनली.
त्यातूनच श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासी, गोरगरीब मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार मनात आला. अनेक मुले दूर राहत असल्याने ते शिक्षणापासून वंचित राहतात. असे लक्षात आल्यानंतर झेंडे यांनी श्रीगोंदा शहरातच मुलांची राहण्याची व्यवस्था केली तर त्यांना तेथेच शिक्षणही घेता येईल. याच भावनेतून २००८ मध्ये शहरातील कुलकर्णी वाड्यात महामानव बाबा आमटे सेवाभावी संस्था या नावाने सहा मुलांना घेऊन त्यांनी वसतिगृह सुरू केले. २०१३ मध्ये शेतकरी कुटुंबातील कन्या शुभांगी हिच्याबरोबर अनंत झेंडे यांचा विवाह झाला. पुढील कार्यासाठी त्यांना पत्नीचीही साथ मिळू लागली.
संस्था स्थापन होऊन १२ वर्षाचा कालावधी लोटला. आता या वसतिगृहात ९५ मुले, ३२ मुली अशा १२७ आदिवासी मुलांना आधाराची सावली मिळाली आहे. या कामात झेंडे यांच्या मागे आमटे परिवार, गिरीश कुलकर्णी, शिला संचेती, मृणाल राडकर, नरेंद्रभाई मिस्त्री, डॉ. प्रकाश बोरा, सतीश बोरा, डॉ. अरुण रोड, अनिल गावडे, उद्धव गायकवाड हे भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळे संस्थेची मांडवगण रस्त्यावर घुगलवडगाव शिवारात सहा एकर जागेवर संस्थेचा जानकीबाई बजाज नावाने मोठा प्रकल्प उभा राहिला आहे. प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. आता येथील सावलीत आदिवासी मुले स्थिरावली आहेत.
आता मदतीपेक्षा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत करणे महत्त्वाचे आहे. भविष्यात संस्थेतील मुलांना सकस आहार, दर्जेदार शिक्षण, स्वावलंबी जीवन जगण्याचा गुरूमंत्र देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
-अनंत झेंडे,
संस्थापक, महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था
स्वेच्छा निवृत्त अधिकाºयांचे गौडबंगाल?
४थोरात महसूलमंत्री असताना मागील कार्यकाळात खासगी सचिव असलेले सेवानिवृत्त अधिकारी पुन्हा कार्यालयात कसे दिसतात? त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. मागील पाच वर्षे हे अधिकारी घरी होते. आता पुन्हा मंत्री झाल्यानंतर हेच अधिकारी थोरातांच्या कार्यालयात काय करतात? प्रशासनात चांगले अधिकारी नाहीत का? स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या अधिकाºयांना पुन्हा घेण्याचे गौडबंगाल काय आहे, हे जनतेला कळू द्या, असेही विखे म्हणाले.