ध्येय साध्य करण्यासाठी कठोर साधना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 14:09 IST2019-09-28T14:08:43+5:302019-09-28T14:09:14+5:30
आपल्यापेक्षा वडीलधा-यांचा सल्ला ऐकून घ्यावा. तो अंमलात आणावा. त्यातच आपले हित असते. जेथे प्रेम, माया नसते तेथे प्रभूचे वास्तव्य नसते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर साधना आवश्यक असते.

ध्येय साध्य करण्यासाठी कठोर साधना करा
सन्मतीवाणी
आपल्यापेक्षा वडीलधा-यांचा सल्ला ऐकून घ्यावा. तो अंमलात आणावा. त्यातच आपले हित असते. जेथे प्रेम, माया नसते तेथे प्रभूचे वास्तव्य नसते. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर साधना आवश्यक असते.
एका पारड्यात तेवीस तीर्थंकर आणि दुस-या पारड्यात महावीरांना ठेवा. महावीरांचे पारडे जड होईल. महावीरांची तपस्या कठोर आहे. त्यांनी नेहमी दुस-यांच्या कल्याणाचा विचार केला म्हणून त्यांना महावीर म्हणतात.
तीर्थंकर संयमाच्या बळावर सर्व काही सांभाळून घेतात. ते नेहमीच प्रभूवर प्रेम करतात. तीर्थंकरांच्या वास्तव्यामुळे सर्वत्र दैैवी गुणांचा अनुभव मिळतो. जेथे प्रेम, माया नसते तेथे प्रभूचे वास्तव्य नसते. धर्म आराधना करताना भाविकांनी श्रद्धा भाव ठेवावा. कोणतीही शंका घेऊ नये. तीर्थंकरांमध्ये वात्सल्याची भावना असते.
आगीवर पाणी टाकल्यावर ती शांत होते. त्याचप्रमाणे प्रतिशोधाच्या भावनेवर ममत्व, वात्सल्यरुपी पाण्याचा वर्षाव करतात. प्रतिशोधाचे नियमन उदबोधन, प्रतिबोध देऊन करतात. साधू संतांमुळेच मुक्तीचा मार्ग मिळेल. माणूस स्वार्थापोटी प्रभूला विसरतो आहे. आत्मकल्याण करण्यासाठीच धर्म आराधना करावयाची असते. ती करताना अनेकदा संघर्ष करावा लागतो. पण संघर्षाचा मुकाबला करून श्रावक आपले ध्येय साध्य करू शकतो. वर्धमान हे महावीर झाले त्यामागे कठोर तपस्या हे प्रमुख कारण आहे.
- पू. श्री. सन्मती महाराज