संगमनेर शेतकी संघाची वाटचाल कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:18 AM2021-02-15T04:18:53+5:302021-02-15T04:18:53+5:30
संगमनेर खुर्द येथे शनिवारी (दि. १३) शेतकी संघाच्या नवीन पेट्रोल पंपाच्या भूमिपूजनप्रसंगी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे अध्यक्ष ...
संगमनेर खुर्द येथे शनिवारी (दि. १३) शेतकी संघाच्या नवीन पेट्रोल पंपाच्या भूमिपूजनप्रसंगी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेचे संचालक अॅड. माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित यांसह संपत डोंगरे, लहानभाऊ गुंजाळ, सुभाष गुंजाळ, संगमनेर खुर्दच्या सरपंच वैशाली सुपेकर, उपसरपंच गणेश शिंदे, रमेश सुपेकर, कैलास पानसरे, अनिल थोरात, रोहिणी गुंजाळ आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री थोरात म्हणाले, सहकारातून संगमनेर तालुक्यात मोठी समृद्धी आली. येथील सहकारातील प्रत्येक संस्था राज्यात अग्रगण्य आहे. या सर्व संस्थांची मातृसंस्था शेतकी संघ आहे. शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचे काम सातत्याने सुरू आहे. अत्यंत काटकसरीने वापर, पारदर्शकता यामुळे हा शेतकी संघ राज्यात अव्वल ठरला आहे. आगामी काळामध्ये नवनवीन बदलांना सामोरे जात शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी शेतकी संघ कटिबद्ध राहील.
शेतकी संघाचे संचालक तुळशीनाथ भोर, सुनील कडलग, बाळासाहेब वाळके, आत्माराम हासे, साहेबराव बारवे, राम तांबे, कमलेश नागरे, अर्जुन घुले, रामभाऊ कडलग, बाबासाहेब जोंधळे, रवींद्र गायकवाड, विश्वनाथ शिंदे, भाऊसाहेब खेमनर, पद्मा कार्ले, अॅड. नानासाहेब शिंदे, राजेंद्र गुंजाळ, रामनाथ डोंगरे, नवनाथ आंधळे, प्रा. बाबा खरात, निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे, सुभाष सांगळे आदी उपस्थित होते.