संत रविदास महाराजांचे कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:36 AM2021-03-04T04:36:56+5:302021-03-04T04:36:56+5:30
राज्य शासनाच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच संत रविदास महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी होत आहे. यानिमित्त जिल्हा परिषदेत संत ...
राज्य शासनाच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच संत रविदास महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी होत आहे. यानिमित्त जिल्हा परिषदेत संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सभापती परहर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी प्रा. गुलाब सय्यद, सहदेव निंभोरे, समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे, प्रमोद साळवे, शशिकांत रासकर आदी उपस्थित होते.
संत रविदास महाराजांनी भजन, कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा, परंपरांवर प्रहार केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही संत रविदास महाराज यांच्या विचारांचा मोठा प्रभाव राहिला. डॉ. आंबेडकर यांनी आपला ‘दी अनटचेबल’ हा ग्रंथही संत रविदास यांनाच समर्पित केला. राज्य शासनाने संत रविदास महाराज यांची शासकीय जयंती साजरी करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे, असे परहर म्हणाले.
---------
फोटो - ०२रोहिदास जयंती
जिल्हा परिषदेत संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सभापती उमेश परहर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी प्रा. गुलाब सय्यद, सहदेव निंभोरे, समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे आदी उपस्थित होते.