सुपा एमआयडीसी-बाबूर्डी रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:15 AM2021-01-01T04:15:49+5:302021-01-01T04:15:49+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील विस्तारित सुपा एमआयडीसी ते बाबूर्डी रस्त्याच्या साईडपट्ट्याचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे रस्ता उखडण्याबरोबरच अपघाताच्या ...

Work on the sidewalks of Supa MIDC-Baburdi road is incomplete | सुपा एमआयडीसी-बाबूर्डी रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम अपूर्ण

सुपा एमआयडीसी-बाबूर्डी रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम अपूर्ण

सुपा : पारनेर तालुक्यातील विस्तारित सुपा एमआयडीसी ते बाबूर्डी रस्त्याच्या साईडपट्ट्याचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे रस्ता उखडण्याबरोबरच अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडत असून, वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

सुपा एमआयडीसीतील म्हसणे फाटा चौकापासून मिंडा कारखान्यापर्यंत चार पदरी चकाचक रस्ता, मध्ये दुभाजक, त्यात वाढलेली रंगीबेरंगी फुलांची झाडे पाहता एखाद्या शहरातील रस्त्यालगतच्या कारखान्यांच्या इमारती, यामुळे या भागाच्या वैभवात भर पडली आहे; मात्र एमआयडीसी हद्द संपली की पूर्वी उखडलेला ओबडधोबड रस्ता होता.

या रस्त्याच्या दुरवस्थेकडे ‘लोकमत’च्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. दरम्यानच्या काळात रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद झाली. रस्त्याचे काम झाले; परंतु साईडपट्ट्यांचे काम संबंधित ठेकेदाराने केले नव्हते. चारपदरी रस्ता संपल्यानंतर छोटा रस्ता सुरू होतो. त्यावरून एकाचवेळी दोन वाहने समोरून आल्यावर एका चालकाला वाहन रस्त्यावरून खाली घ्यावे लागते. अशावेळी साईडपट्ट्या नसल्याने रस्त्याच्या उंच भागावर चाके एकदम खाली उतरतात. एखादे वाहन वेगात असेल तर ते उलटण्याची शक्यता असते. त्यामुळे हे काम तातडीने होणे गरजेचे असल्याचे वाहनचालक-मालकांनी सांगितले.

----

बाबूर्डी रस्त्यालगतच्या साईडपट्ट्यांचे काम अपूर्णावस्थेत आहे. त्याचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात येईल. काम पूर्ण करून घेतले जाईल.

-श्रीरंग देवकुळे,

उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

फोटो ३१ बाबूर्डी रस्ता

पारनेर तालुक्यातील बाबूर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम अपूर्ण आहे.

Web Title: Work on the sidewalks of Supa MIDC-Baburdi road is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.