कंत्राटी कर्मचाºयांचे नेवाशात काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 04:44 PM2020-06-11T16:44:36+5:302020-06-11T16:44:49+5:30

नेवासा (जि. अहमदनगर) : राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कर्मचाºयांचे नियमित शासन सेवेत समायोजना करण्यासाठी कर्मचाºयांनी गुरुवारी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनाला गुरुवारी सुरूवात करण्यात आली. 

Work stoppage agitation of contract workers in Nevasa | कंत्राटी कर्मचाºयांचे नेवाशात काम बंद आंदोलन

कंत्राटी कर्मचाºयांचे नेवाशात काम बंद आंदोलन

नेवासा (जि. अहमदनगर) : राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कर्मचाºयांचे नियमित शासन सेवेत समायोजना करण्यासाठी कर्मचाºयांनी गुरुवारी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनाला गुरुवारी सुरूवात करण्यात आली. 
या आंदोलनात नेवासा तालुक्यातील कंत्राटी कर्मचाºयांनी सहभागी होवून शासनाच्या दुपटी भुमिकेचा निषेध केला. कंत्राटी कर्मचाºयायाबाबत शाासनाची भुमिका उदासिन आहे. तालुक्यातील २३ कर्मचारी मागील १३ वर्षांपासून काम करत असून आम्हाला सेवेत कायम करून घेतलेले नाही. कोरोना संकटात आमच्या सर्व कर्मचाºयांनी जीवाची पर्वा न करता काम केले. परंतु शासनाने एन -९५ मास्क व पीपीइ कीट देखील दिली नाही. त्यामुळे आपल्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाºयांनी ११ जूनपासून कामबंद आंदोलनास सुरवात केली. या आंदोलनात तालुक्यातील २३ कर्मचाºयांनी सहभाग नोंदवला. याबाबत विविध मागण्याचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी जयश्री साळवे, सुनीता मिसाळ, कुमुदिनी शिंदे, शैला शिंदे, छाया जावळे, लता आहेर, वनिता काळे, मनीषा कचरे, मोना पातारे, मारिया जाधव, मोना भोसले, ताई काळे, राणी पंडित, मनीषा एडके, वैशाली बनसोडे, जितेंद्र करेशिया, संभाजी इंगळे आंदोलनात सहभागी होते.

Web Title: Work stoppage agitation of contract workers in Nevasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.