आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राळेगणमध्ये कार्यकर्ता शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 03:53 PM2019-01-24T15:53:24+5:302019-01-24T15:54:39+5:30
केंद्रात लोकपाल नियुक्त व्हावा व राज्यात लोकायुक्त कायदा करावा आणि शेतक-यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय व्हावेत यासह इतर मागण्यांसाठी 30 जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथीपासून जेष्ठ समाजसेवक डॉ. अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे आंदोलन सुरू करीत आहेत.
राळेगणसिद्धी : केंद्रात लोकपाल नियुक्त व्हावा व राज्यात लोकायुक्त कायदा करावा आणि शेतक-यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय व्हावेत यासह इतर मागण्यांसाठी 30 जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथीपासून जेष्ठ समाजसेवक डॉ. अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे आंदोलन सुरू करीत आहेत. या आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी आज हिंद स्वराज ट्रस्ट येथे राष्ट्रीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात डॉ. अजित देशमुख, शाम असावा, अशोक सबबन, तरूष उत्पल, सुशिल भट्ट, मनिष ब्रम्हभट्ट, भोपाल सिंग, राम नाईक, प्रविण भारती, एच. वाजपेयी, कर्नल नयन दिनेश, अक्षय कुमार, शिवकुमार शर्मा, जगजीतसिंग, शिवाजी खेडकर, सरपंच प्रभावती पठारे, गायत्री गाजरे, लाभेष औटी, सुरेश पठारे, सुनिल हजारे यांच्यासह महाराष्ट्र व देशभरातून 500 हून अधिक कार्यकर्ते राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत.
या शिबिरात 30 जानेवारीपासून अण्णांचे सुरू होणा-या आंदोलनाची रणनीती व देशभरात आंदोलन कशा पध्दतीने पुढे न्यायचे यावर दिवसभरात विविध विषयांवर चर्चा होणारआहे तसेच यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल.