कामगारांचा मूक सत्याहग्रहचा ईशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:30 AM2021-02-23T04:30:34+5:302021-02-23T04:30:34+5:30
युनियनची शनिवारी अरणागाव (ता. नगर) येथे झाली. वाढती महागाई, कोरोना महामारीमुळे कामगारांवर अर्थिक संकट ओढावले आहे. कामगारांना दरमहा ...
युनियनची शनिवारी अरणागाव (ता. नगर) येथे झाली. वाढती महागाई, कोरोना महामारीमुळे कामगारांवर अर्थिक संकट ओढावले आहे. कामगारांना दरमहा चार हजार पाचशे तर पुढील दोन वर्षासाठी दरमहा पाच हजार पाचशे रुपये पगारवाढ देण्याची मागणी आहे. शेवटच्या तारखेत पगारवाढीवर तोडगा न निघाल्यास मेहेर बाबांच्या धुनी जवळ न्याय मिळण्यासाठी मुक सत्याग्रह करण्याचा निर्णय या बैठकित घेण्यात आला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन युनियनच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, किशोर कांबळे, प्रविण भिंगारदिवे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लाल बावटाचे जिल्हा सचिव अॅड.कॉ. सुधीर टोकेकर यांनी सर्व कराराची, डिमांड नोटिसा व मध्यस्थी बाबत माहिती दिली. युनियनचे अध्यक्ष सतीश पवार यांनी वेतनवाढीची अवाजवी मागणी केली नसून, किमान कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा या पध्दतीने कामगारांना वेतनवाढ मिळाली पाहिजे. ट्रस्टचा बॅलेन्सशीट चांगला असून मोठी उलाढाल सुरु असताना कामागारांप्रती सहानुभूतीपुर्वक विचार करण्याची गरज असल्याची भूमिका मांडली.
...............
फोटो २१ कामगार
ओळी- वेतनवाढीसाठी अवतार मेहेरबाबा ट्रस्ट कामगारांनी बैठक घेत मूकसत्याग्रहाचा ईशारा दिला.