जगाला धर्म शिकविण्यासाठी महासत्ता व्हायचेय- मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 05:41 AM2018-08-23T05:41:05+5:302018-08-23T05:41:51+5:30
साई समाधी शताब्दीनिमित्त साईनगरीत सुरू असलेल्या गंगागिरी हरिनाम सप्ताहाला बुधवारी भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिर्डी : भारताला अमेरिकेप्रमाणे व्यापारावर कब्जा करण्यासाठी किंवा चीनसारखे शेजारील देश गिळंकृत करण्यासाठी नाही, तर जगाला धर्म शिकविण्यासाठी महासत्ता व्हायचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिर्डीत व्यक्त केले.
साई समाधी शताब्दीनिमित्त साईनगरीत सुरू असलेल्या गंगागिरी हरिनाम सप्ताहाला बुधवारी भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती.
महंत रामगिरी यांच्या प्रवचनानंतर भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधला़ संतांनी कलीयुगात उत्तम ग्रहस्थ जीवनाचा मार्ग दाखवणारा धर्म सांगितला़ भक्तीचा मार्ग सांगितला़ त्यामुळेच आपण तरलो़ या भक्तीची शक्ती व युक्ती सर्व जगाला देण्यासाठी भारताचे प्रयोजन आहे़ भारतमातेचे पुत्र म्हणून आपले ते कर्तव्य आहे. हाच संदेश जगाला देण्यासाठी भारत समर्थ झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
या वेळी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे उपस्थित होते़