लस पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:14+5:302021-06-17T04:15:14+5:30
टाकळीभान : टाकळीभान येथे लोकसंख्येच्या प्रमाणात लस पुरवठा करण्याचे लेखी पत्र मंडलाधिकारी सी. बी. बोरूडे व कामगार तलाठी अरूण ...
टाकळीभान : टाकळीभान येथे लोकसंख्येच्या प्रमाणात लस पुरवठा करण्याचे लेखी पत्र मंडलाधिकारी सी. बी. बोरूडे व कामगार तलाठी अरूण हिवाळे यांनी दिल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य मंडळाने सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले.
गावाला पुरेशी लसींची मात्रा उपलब्ध होत नसल्याने येथील तलाठी कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य उपोषणास बसले होते. तसे निवेदन यापूर्वीच तहसीलदारांना देण्यात आले होते. मात्र, कुठलेही लेखी आश्वासन न मिळाल्याने उपोषण सुरू करण्यात आले होते. अखेर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत सूचित केल्याचे लेखी पत्र देण्यात आले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, दत्तात्रय नाईक, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, रावसाहेब मगर, सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मयुर पटारे, सुनील बोडखे, भाऊसाहेब पटारे, मोहन रणनवरे, गणेश कोकणे, यशवंत रणनवरे, राजेंद्र कोकणे, कोतवाल सदाशिव रणनवरे, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
------
फोटो ओळी : टाकळीभान
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना लस पुरवठा करण्याचे आश्वासन देताना तलाठी व ग्रामसेवक.
------------