नव्या पिढीने काटे सहन करण्याची तयारी ठेवावी : यशवंतराव गडाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:43 PM2017-10-17T14:43:48+5:302017-10-17T14:46:19+5:30

अहमदनगर : राजकारण म्हणजे केवळ फुलांवरून चालने एवढे सोपे राजकारण नाही. राजकारणात अनेक काटे असतात. ते सहन करण्याची तयारी नव्या पिढीने ...

Yashwantrao Gadakh should be prepared to bear new generations: | नव्या पिढीने काटे सहन करण्याची तयारी ठेवावी : यशवंतराव गडाख

नव्या पिढीने काटे सहन करण्याची तयारी ठेवावी : यशवंतराव गडाख

अहमदनगर : राजकारण म्हणजे केवळ फुलांवरून चालने एवढे सोपे राजकारण नाही. राजकारणात अनेक काटे असतात. ते सहन करण्याची तयारी नव्या पिढीने ठेवली पाहिजे, असे मत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी नगर येथे व्यक्त केले.
कै. राजीव अप्पासाहेब राजळे व कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते़ पालकमंत्री राम शिदे, आ. शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे आदी यावेळी उपस्थित होते. आकाशात अत्यंत तेजस्वी लुककणारा तारा आला नि गेला, असे सांगून गडाख यांनी माजी आमदार राजीव राजळे यांच्या स्वभावाचे विविध पैलूंवर भाष्य केले. ते म्हणाले, भाषणातून नेहमी सांगितले जाते की तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. प्रत्यक्षात राजकारणातील नव्या पिढीच्या युवा नेत्यांचे अनुभव खूप वेगळे आहेत़ राजकारणी एका ठराविक चौकटींच्या बाहेर जात नाहीत पण, राजाभाऊ चौकटीतला माणूस नव्हता. त्याने समाजाचा सर्व बाजंूनी अभ्यास केला़त्यामुळे त्यांचे कर्र्र्तृत्व जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनाच नव्हे तर पक्षांनाही झेपल नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राजकरणातील व्यक्तींचा एकमेकांशी असलेला संवाद कमी झाला आहे़ जुन्या पिढीने हा जिल्हा एका उंचीवर नेऊन ठेवला़ जुन्या पिढीतील सर्व नेत्यांचा आवर्जून उल्लेख करत गडाख जुन्या नेत्यांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते़ एकमेकांच्या दुखात ते सहभागी असायचे. एकमेकांच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहायचे. राजकरणापलिकडे जावून त्यांनी वैयक्तिक संबध जपले़ त्यांच्यात उत्तम संवाद होता. त्यामुळे जिल्ह्याचे वजन होते़ राजकारणाला त्यांनी एक परंपरा घालून दिली़ खाल्याच्या पातळीवर जावून त्यांनी राजकारण केले नाही, असे गडाख यावेळी म्हणाले.


राजाभाऊ लोकल टु ग्लोबल व्यक्ती

राजाभाऊ आणि माझी भेट दिल्ली येथील कॅफे हाऊसमध्ये झाली. ही व्यक्ती कधी कॉफी, कधी विदेशी लेखन, गावातल्या समस्या, अशा विविध विषयांवर बोलत असे. हा माणू जसाअंतराष्ट्रीय परिषदेत जसा शोभायचा तसाच तो गावातल्या चौक सभेतही उठून दिसायचा, असे सांगून मंदार भारदे यांनी राजीव राजळे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Web Title: Yashwantrao Gadakh should be prepared to bear new generations:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.