यंदा साखर उतारा अडीच टक्क्यांनी घटणार; महिनाभर आधीच साखर कारखाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 02:23 PM2020-06-26T14:23:06+5:302020-06-26T14:23:37+5:30
यंदाच्या गळीत हंगामात १५ आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू होणार आहेत. त्यामुळे साखर उता-यात दोन ते अडीच टक्क्यांनी घट होणार आहे. याचा कारखान्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
राहुरी : यंदाच्या गळीत हंगामात १५ आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू होणार आहेत. त्यामुळे साखर उता-यात दोन ते अडीच टक्क्यांनी घट होणार आहे. याचा कारखान्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
यंदा महाराष्ट्रामध्ये ८०० लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात ५६५ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. मात्र ऊसतोडणीसाठी कामगार लक्षात घेता शासनाने एक महिना अगोदर साखर कारखाने सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्यावर्षी साखर कारखान्यांना नऊ ते दहा या दरम्यान उसाचा उतारा मिळाला होता. या वर्षी साखर कारखाने लवकर सुरू होणार असल्याने सात ते आठ टक्के उतारा मिळण्याची शक्यता आहे. उशिरा साखर कारखाने सुरू झाल्यानंतर उसाला उतारा मिळतो. मात्र उन्हाळ्यात उताºयात घट होते.
साखर कारखाने लवकर सुरू होणार असल्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्याचा बाजार भाव देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे कारखान्यांसमोर अडचणी निर्माण होणार आहे, असे साखर तज्ज्ञ सुखदेव शेटे यांनी सांगितले.