वर्षानुवर्षांची प्रथा आजही टिकून; म्हणे, जावयांना धोंडे खाऊ घातले, तर होतो अपघात..!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 03:47 PM2023-08-01T15:47:52+5:302023-08-01T15:49:08+5:30
ही प्रथा कशी पडली, याची ठोस माहिती सांगता येत नाही मात्र या गावात कधी काळी कोणी जावयांना धोंडे खाऊ घातले आणि जावयाच्या घरी दुर्घटना घडली, त्यानंतर भीतीपोटी ही प्रथा बंद केली.
योगेश गुंड -
केडगाव (अहमदनगर) : अधिक मास सुरू असल्याने सध्या सगळीकडेच जावयांच्या धोंड्याच्या जेवणाची धामधूम सुरू आहे. जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देण्यासाठी सासुरवाडीच्या लोकांची सध्या लगबग सुरू आहे. त्याचे सोशल मीडियावरही सेलिब्रेशन फोटो सुरू आहेत. मात्र, नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी गावात जावयांना धोंड्याचे जेवण खाऊ न घालण्याची जुनी प्रथा आजही कायम आहे.
ही प्रथा कशी पडली, याची ठोस माहिती सांगता येत नाही मात्र या गावात कधी काळी कोणी जावयांना धोंडे खाऊ घातले आणि जावयाच्या घरी दुर्घटना घडली, त्यानंतर भीतीपोटी ही प्रथा बंद केली.
भीतीमुळे प्रथा बंद
काहींच्या मते अधिक मासात जावयांना धोंडे खाऊ घातल्यास गावात रोगराई सुरू झाली. यामुळे अनेकांचा जीव गेला. यामुळे गावाने अधिक मासात जावयांना धोंड्यांचे जेवण खाऊ घालण्याची प्रथाच एकमुखाने बंद केली