योग प्राणायाम, भजनामुळे रूग्णांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:19 AM2021-05-23T04:19:55+5:302021-05-23T04:19:55+5:30
देवदैठण : कोरोना झाल्यावर व्यक्ती घाबरून जाते व नकारात्मक विचार करायला सुरुवात करताे. आजारात मानसिकता खालावल्यामुळे जीविताला धोका होतो. ...
देवदैठण : कोरोना झाल्यावर व्यक्ती घाबरून जाते व नकारात्मक विचार करायला सुरुवात करताे. आजारात मानसिकता खालावल्यामुळे जीविताला धोका होतो. मी बरा होऊ शकतो हा आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे योग प्राणायाम, भजनसंध्येचे आयोजन करून रुग्णांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण केली जात आहे.
येथील अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरात रूग्णांसाठी प्राथमिक शिक्षक प्रताप घायतडक यांनी योग प्राणायाम प्रात्यक्षिक करत विविध मनोरंजक खेळ घेऊन नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या रूग्णांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवले. तसेच शरीरात सकारात्मक बदल घडून लवकर बरे होण्यासाठी मेडिटेशन कसे करावे याचे तंत्र शिकविले. तसेच रूग्णांसाठी भजनसंध्येचे आयोजन करून विलास वाघमारे, जालिंदर वेताळ, अंकुश कौठाळे, बापू खेडकर, दीपक वाघमारे या सर्वांनी टाळ मृदंगाच्या साथीत भजन, अभंग, गवळणीचे गायन करून कोविड आरोग्य मंदिराच्या वातावरणात उत्साह निर्माण केला.
या कार्यक्रमांमुळे आरोग्य मंदिरातील रूग्णांमध्ये मी बरा होणार अशी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्योजक अतुल लोखंडे, दीपक वाघमारे, संदीप बोरगे, प्रतीक वाघमारे, अजित वाघमारे यांनी प्रयत्न केले.
220521\img_20210520_185833.jpg
देवदैठण येथील डॉ पद्मभूषण अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरात प्रताप घायतडक यांनी रुग्णांना प्राणायामाचे धडे दिले ( छायाचित्र - संदीप घावटे )