राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ‘योगा प्रोटोकॉल’ वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:25 AM2021-09-15T04:25:35+5:302021-09-15T04:25:35+5:30

प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. मंगेश ठोमके होते. त्यांनी योग, ध्यानधारणा, प्राणायाम व पोषण ...

‘Yoga Protocol’ Webinar at Radhabai Kale Women’s College | राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ‘योगा प्रोटोकॉल’ वेबिनार

राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ‘योगा प्रोटोकॉल’ वेबिनार

प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. मंगेश ठोमके होते. त्यांनी योग, ध्यानधारणा, प्राणायाम व पोषण आहाराविषयी मार्गदर्शन केले. प्र. प्राचार्य डॉ. माधव सरोदे कार्यक्रमास उपस्थित होते. प्रा. ठोमके यांनी सांगितले की, महिला सबलीकरणासाठी योग्य आहाराबरोबरच नित्य ताडासन, कटी चकासन अधिकासन, पदोतानासन, नाडीशोधन, प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम केल्याने प्रकृती सुदृढ राहते व आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपले जगणे सुंदर होते. त्यासाठी जीवनात योगाभ्यास एक मौलिक कला असल्याचे त्यांनी सांगितले.

उपप्राचार्य प्रा. नासिर सय्यद यांनी महिलांचे आरोग्यावर पारिवारिक व सामाजिक विकास अवलंबून असल्याने सेवकांनी योगाभ्यासाला जास्त महत्त्व देण्याबाबत आवाहन केले. वेबिनार कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. बर्वे, तसेच आयक्यएसीचे समन्वयक प्रा. एम. आर. खान उपस्थित होते. या कार्यक्रमात १२५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. राजाराम कानडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम अधिकारी डॉ. मंजुश्री भागवत यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. गणेश विधाटे यांनी केले, तर आभार डॉ. एस. एस. केकडे यांनी मानले. प्रा. विलास एलके, प्रा. निर्मला दरेकर, प्रा. श्रीम. एस. एस. ठुबे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: ‘Yoga Protocol’ Webinar at Radhabai Kale Women’s College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.