योगेश बाफना यांना औषध निर्माणशास्त्रात पीएचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:06+5:302021-02-10T04:20:06+5:30

अहमदनगर : येथील अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रमुख प्रा. योगेश बाफना यांना सनराईज विश्‍वविद्यालयाच्या यु.जी.सी मान्यता प्राप्त विद्यापिठातून औषध ...

Yogesh Bafna holds a PhD in Pharmacology | योगेश बाफना यांना औषध निर्माणशास्त्रात पीएचडी

योगेश बाफना यांना औषध निर्माणशास्त्रात पीएचडी

अहमदनगर : येथील अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रमुख प्रा. योगेश बाफना यांना सनराईज विश्‍वविद्यालयाच्या यु.जी.सी मान्यता प्राप्त विद्यापिठातून औषध निर्माणशास्त्र विद्याशाखेची पीएच.डी. ही पदवी प्राप्त झाली आहे. त्यांचे दोन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिध्द झाले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या या यशाबद्दल कडायेथील अमोलक जैन विद्या प्रसारक संस्थेचे हेमंत पोखरणा, कांतीलाल चाणोदिया, डॉ. उमेश गांधी, महावीर इंटरनॉनशनलचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र बाफना, झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा यांनी कौतुक केले आहे. प्रा. योगेश बाफना हे पारनेर तालुक्यातील सुपा येथील जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुरेश बाफना यांचे चिरंजीव आहेत.

---------

फोटो० ०९ योगेश बाफना

-----------

सोनल भळगटिया सीए. उत्तीर्ण

अहमदनगर : गणेशनगर (ता. राहाता) येथील सोनल भिकचंद भळगटिया हिने सीए. परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. गणेशनगर परिसरातील प्रतिष्ठित व्यापारी व जैन श्रावक संघाचे सामाजिक कार्यकर्ते भिकचंद भळगटिया यांची ती कन्या आहे. सोनलने श्रीरामपूरमध्ये बारावी परीक्षेतही प्रथम श्रेणीत यश मिळविले होते.. तिने पुणे येथे सिम्बॉयसीमध्ये बी. कॉम.ची पदवी मिळविली. तसेच बी स्मार्ट ऑण्ड असोसिएटसस्यांच्या मार्गदर्शनाखाली आर्टीकलशीप पूर्ण केली. तिच्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

--फोटो- ०९ सोनल भळगटिया

Web Title: Yogesh Bafna holds a PhD in Pharmacology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.