तुम्ही घोंगडं अंगावर टाकलं, तुमचा प्रश्न मी सोडवतो

By Admin | Published: May 31, 2014 11:36 PM2014-05-31T23:36:27+5:302014-06-01T00:22:28+5:30

गोपीनाथ मुंडे : अहिल्यादेवींच्या कारभारासारखे काम करू

You put a finger on your neck, I will solve your problem | तुम्ही घोंगडं अंगावर टाकलं, तुमचा प्रश्न मी सोडवतो

तुम्ही घोंगडं अंगावर टाकलं, तुमचा प्रश्न मी सोडवतो

जामखेड : देशात भाजपा व घटक पक्षाच सरकार सत्तेत आले आहे. अहिल्यादेवींनी जसा राज्यकारभार केला त्याचप्रमाणे आम्ही राज्य कारभार करण्याचे वचन देतो. तुम्ही सत्काररूपात घोंगडी अंगावर टाकली आहे. आता तुमचे प्रश्न माझ्या अंगावर घेतले आहेत. आरक्षण मुद्याला न्याय देऊ, अशी ग्वाही केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी दिली. अहिल्यादेवींचे जन्मस्थळ असलेल्या चोंडी गावी २८९ वी जयंती व धनगर समाजाचा मेळावा राष्टÑीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, रासप अध्यक्ष महादेव जानकर, प्रदेशाध्यक्ष पुंडलिक काळे, खा.दिलीप गांधी, खा.सदाशिव लोखंडे, आ. राम शिंदे, आ. प्रकाश शेंडगे, आ. अनिल गोरे, आ. माधुरी मिसाळ, रिपाइं जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, सुशिला मोराळे, नामदेव राऊत, अशोक खेडकर, सुर्यकांत मोरे, प्रा. लक्ष्मण ढेपे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. प्रारंभी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुंडे म्हणाले, अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त मी दरवर्षी येतो. यावेळी परिवर्तन घेऊन आलो आहे. त्यामुळे मोठा जनसमुदाय आला आहे. महादेव जानकरांनी बारामतीमधून चांगली झुंज दिली. तो वाघ आहे. पडला तरी तोंड लपून बसला नाही. त्याला बारामतीला उभा करण्याचा माझा निर्णय योग्यच होता. बारामतीचा खासदार आपला आला नसला तरी आता बारामतीचा आमदार पाडायचा आहे व आपला आणायचा आहे. जानकरांना आमदार नाही तर खासदार करणार आहे, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली. दिल्लीत राज्य आले आहे. राज्यात परिवर्तन होणार असल्याने तुमचा आरक्षणाचा प्रश्न मी सोडवील. महाराष्टÑ राज्याबाबत भेदभाव करणार नाही. त्यांना सांगतो तुम्ही पैसे मागा कमी पडू देणार नाही. जमिन अधिग्रहणसंबंधी कायदा संमत केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची जमिनीला चारपट भाव मिळणार आहे. आता महाराष्टÑाच्या परिवर्तनाला साथ द्या, अशी हाक मुंडे यांनी जनसमुदायाला केली. (तालुकाप्रतिनिधी)देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींच्या आशीर्वादाने देशात परिवर्तन झाले आहे. आता आॅक्टोबरमध्ये एकदा परिवर्तन करा. धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी केंद्रातील सरकार एकटे काही करू शकत नाही. त्यासाठी राज्य सरकारने शिफारस करावी लागते. त्यामुळे राज्यात आपलेच सरकार आणावे लागणार आहे. ४महादेव जानकर म्हणाले, मुंडे यांनी मला महायुतीत आणून माझी उंची वाढवली आहे. त्यांनी वडिलासारखे प्रेम माझ्यावर केले आहे. आता चोंडीतून रेल्वे जाईल, अशी आमची मागणी आहे. ती पूर्ण करा.

Web Title: You put a finger on your neck, I will solve your problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.