गुहा परिसरातील तरुणाची विहिरीत उडी मारुन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:54 AM2020-08-08T11:54:00+5:302020-08-08T11:54:36+5:30
राहुरी तालुक्यातील गुह परिसरातील रोहन बबन ओहळ (वय १९ ) या तरुणाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (७ आॅगस्ट) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
राहुरी : तालुक्यातील गुह परिसरातील रोहन बबन ओहळ (वय १९ ) या तरुणाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (७ आॅगस्ट) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
रोहन हा सकाळी एका जणाला नगर येथे कामावर जायचे असल्याने तो दुचाकीवरून त्यास राहुरी फॅक्टरी येथे बसस्टँडवर सोडण्यासाठी गेला होता. तो बराच वेळ होऊनही घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. रोहनच्या वडिलांना अज्ञाताने तुमची दुचाकी गुहा-तांभेरे रस्त्यालगत पडली असल्याची माहिती दूरध्वनीवरून दिली.
यावेळी ते दुचाकी पडलेल्या ठिकाणी पहायला गेले असता त्यांनी रोहनचा आजूबाजूला शोध घेतला. रस्त्यापासून दीडशे ते दोनशे फूट अंतरावर एका विहिरीच्या पाण्यात त्याच्या चपला तरंगताना दिसून आल्या. ही घटना समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात तुडुंब भरलेले विहिरीत रोहनचा शोध सुरू केला . रोहनचा मृतदेह विहिरीच्या कपारीला दिसून आला. त्याला राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांंनी घोषित केले. रोहनच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे. रोहन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.