कोकमठाण परिसरातील तरुण निघाला कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 04:19 PM2020-07-18T16:19:51+5:302020-07-18T16:21:25+5:30
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरातील शामवाडी येथील ३२ वर्षीय तरूण शनिवारी (दि.१८ ) दुपारी कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण परिसरातील शामवाडी येथील ३२ वर्षीय तरूण शनिवारी (दि.१८ ) दुपारी कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
कोकमठाण येथील ३२ वर्षीय तरुण हा पुणे येथे आपल्या मित्रासोबत एका रूममध्ये राहत होता. १५ जुलैला तो कोकमठाण येथे आल्यानंतर त्याला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. पुणे येथील त्याच्या मित्राला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या तरुणाचा स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. तरुणाच्या संपर्कातील व्यक्तींचा प्रशासनाच्या वतीनेशोध घेण्याचे काम सुरू आहे.
कोपरगाव तालुक्यातील रुग्णांची संख्या २५ झाली आहे. तालुक्यातील १२ जण उपचार घेत आहे. तर १२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर कोपरगाव शहरातील एक महिला मयत झालेली आहे. करंजी येथील अहवाल प्रलंबित आहेत. सुरेगाव परिसरातील रुग्ण वाढत असल्याने कोळपेवाडी, कोळगाव थडी, सुरेगाव शहजापूर व वेळापूर या पाच गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारचे दुकाने १८ ते २६ जुलै पर्यंत ९ दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.