तरुणाईने भाजपची झोप उडविली-शरद पवार, कर्जतला सांगता सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:30 PM2019-10-19T13:30:58+5:302019-10-19T13:31:06+5:30
भाजप सरकारच्या काळात राज्यात १६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. अनेक उद्योग बंद पडले. बेरोजगारी वाढली. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आघाडीच्या पाठिशी आहे. या निवडणुकीत तरुणांनी भाजपची झोप उडविली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कर्जत येथे केली.
कर्जत : भाजप सरकारच्या काळात राज्यात १६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. अनेक उद्योग बंद पडले. बेरोजगारी वाढली. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आघाडीच्या पाठिशी आहे. या निवडणुकीत तरुणांनी भाजपची झोप उडविली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कर्जत येथे केली.
कर्जत-जामखेड मतदार संघात पवारांचे नातू रोहित पवार हे उमेदवारी करीत आहेत. त्यांच्या सांगता सभेसाठी शनिवारी पवार आले होते. पावसामुळे हेलिकॉप्टर लँड होण्यात अडचणी होत्या. त्यामुळे पवार हे कारने कर्जतला आले. पावसामुळे सभास्थळी बसण्यास जागा नव्हती. त्यामुळे लोकांनी उभे राहून सभा ऐकली. सभेत पवारांनी भाजप सरकारवर टीका केली. रोहितला संधी मिळाल्यास कर्जत जामखेडचा बारामतीसारखा विकास करुन दाखवू. कुस्ती खेळताना समोर तगडा प्रतिस्पर्धी हवा. कुस्ती कशी खेळतात हे भाजपवाल्यांना २४ तारखेलाच कळेल, असेही ते म्हणाले.