कंबरेला गावठी कट्ठा लावून गावात फिरणाऱ्या तरुणाला अटक
By अण्णा नवथर | Published: January 18, 2024 04:32 PM2024-01-18T16:32:41+5:302024-01-18T16:33:04+5:30
नेवासा तालुक्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
अण्णा नवथर, लाेकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: कंबरेला गावठी कट्टा लावून गावात फिरत असलेल्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी (दि. १८) नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे केली.
कैलास आसाराम म्हस्के (रा. उस्थळ दुमाला, ता. नेवासा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विना परवाना गावठी कट्टा घेऊन गावातील शाळेच्या कमानीजवळ एक इसम उभा आहे, अशी गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर- छत्रपती संभाजीनगर रोडवरील उस्थळ दुमाला येथे दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला एक गावठी कट्ट्यासह आरोपीला अटक केली. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे गावठी कट्टा व एक हजार रुपये किमतीचे दोन जीवंत काडतूसे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही नेवासा तालुक्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. गावठी कट्ट्याचा वापर गावात दहशत माजविण्यासाठी केला जात असल्याचे वेळोवेळी झालेल्या कारवाईवरून समोर आलेले आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरिक्षक सोपान गोरे, दत्तात्रय गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, रविंद्र कर्डिले, संदीप दरंदले आदींच्या पथकाने केली.