आजीला भेटायला आलेला तरुण निघाला पॉझिटिव्ह; एकाच कुटुंबातील आठ जण क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 04:21 PM2020-06-01T16:21:09+5:302020-06-01T16:21:37+5:30
राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एक तरुण रविवारी (दि.३१ मे) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा तरुण मागील महिन्यात सोमवारी ( दि.२५ मे) रोजी कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे आपल्या आईसह मामाच्या गावी ७५ वर्षाच्या आजीला भेटण्यासाठी आला होता.
कोपरगाव : राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एक तरुण रविवारी (दि.३१ मे) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा तरुण मागील महिन्यात सोमवारी ( दि.२५ मे) रोजी कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे आपल्या आईसह मामाच्या गावी ७५ वर्षाच्या आजीला भेटण्यासाठी आला होता.
दिवसभर तेथेच वास्तव्यास होता. दरम्यान तो तरुण पॉझिटिव्ह सापडल्याने गोधेगाव येथील एकाच कुटुंबातील ८ व्यक्तींना कोपरगाव येथील कोरोना केअर सेंटर येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये २ पुरुष, एका आजीसह ६ महिलांचा समावेश आहे. यातील थेट संपर्कात आलेल्या पाच व्यक्तींचे स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठविले आहे.
अजूनही चार व्यक्ती संपर्कात आल्या असून त्यांची माहिती घेत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौदर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, गोधेगावातील ज्या ठिकाणच्या लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची ८० घरांची लोकवस्ती आहे. तेथील सर्व कुटुंबांना पुढील दहा दिवसाठी होम क्वारंटाईन केले आहे. गाव पुढील २४ तासांसाठी पूर्णपणे बंद केले आहे, असे गोधेगावचे सरपंच अशोक भोकरे यांनी सांगितले.