शिवरायांचा विचार तरुणांनी समजून घ्यायला हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:14 AM2021-02-22T04:14:26+5:302021-02-22T04:14:26+5:30
निघोज : देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांनी शिवरायांचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे, असे आवाहन शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांनी ...
निघोज : देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांनी शिवरायांचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे, असे आवाहन शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांनी केले.
कुलाबा (मुंबई) येथील भारतीय पोर्ट्स सेना संलग्न ससून डॉक मच्छी वाहक हातगाडी कामगार संघ यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी ते बाेलत होते. कवाद यांनी विविध दाखले देत शिवरायांचा इतिहास उपस्थितांपुढे मांडला.
येथील शिवजयंती उत्सवासाठी उद्योजक कृष्णा पवळे, शिवाजी बोरकर, संदीप पाटील वराळ युवा मंच, राजू वराळ, सुरेश लामखडे, शिवाजीराव लाळगे, पिराजी पवार, देविदास पवार, नीलेश वराळ, विलास कवाद, सुहास वराळ, गौतम तनपुरे, अशोक लंके, संतोष वाळके, वैभव पाडळकर, ज्ञानेश्वर लांडगे, नवनाथ बोचरे, चित्रकार प्रा. ज्ञानेश्वर कवडे, हौशीराम शेटे, प्रफुल्ल लंके, भाऊसाहेब वायकर, संतोष वाळके, सुरेश लाळगे आदींसह महिलाही उपस्थित होत्या.
---
२१ निघोज शिवजयंती
कुलाबा येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. ज्ञानेश्वर कवाद.