आपली छोटी चूक परिवार संकटात टाकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:22+5:302021-02-07T04:20:22+5:30
निंबळक : वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघातावर नियंत्रण येईल. त्यातूनच आपला परिवार सुरक्षित राहू शकतो. वाहन चालविताना झालेल्या ...
निंबळक : वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघातावर नियंत्रण येईल. त्यातूनच आपला परिवार सुरक्षित राहू शकतो. वाहन चालविताना झालेल्या छोट्याशा चुकीने अपघात झाला तर आपला परिवार संकटात येेतो, असे प्रतिपादन शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी केले.
ड्राइव्हर सेवा ट्रस्ट महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, महाराष्ट्र हायवे पोलीस, शहर वाहतूक पोलीस यांच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत कार्यक्रमप्रसंगी केडगाव- अरणगाव बायपास येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मेहेरबाबा ट्रस्टचे रमेश जंगले, सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, शरद दळवी, उत्तर महाराष्ट्र केसरी योगेश पवार, ड्रायव्हर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष गोरख कल्हापुरे, दत्तात्रय जाधव, उत्तम गाडे, संतोष शिंदे, राजेंद्र धनगर, राजेंद्र ढवण, दत्तात्रय विटेकर, अभयसिंग राठी, अशोक गव्हाणे, पोपट पुंड, सुदाम गव्हाणे, रंगनाथ शिंदे, गणेश परभणे, बाळासाहेब दळवी, अतुल कडुस आदी उपस्थित होते.