प्रवरा नदीपात्रात तरुणाची आत्महत्या, वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी
By शिवाजी पवार | Updated: June 24, 2023 13:41 IST2023-06-24T13:40:15+5:302023-06-24T13:41:05+5:30
बेलापूर येथील घटना

प्रवरा नदीपात्रात तरुणाची आत्महत्या, वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी
शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : तालुक्यातील बेलापूर येथील प्रवरानदीपात्रात एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. शनिवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
मयत तरुणाचे नाव अक्षय राजेंद्र गांगुर्डे (रा.चांदेगाव ता.राहुरी ) असे आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरूणानी नदीत उड्या घेत तरुणास वाचविण्यास प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत तरूण बुडाला होता. सध्या नदीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गांगुर्डे याला वाचवण्यात अपयश आले.
काही वेळातच तरूणांनी नदीत गांगुर्डे याचा शोध घेतला. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तरूणाचा मृतदेह तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रूग्णालयात शवच्छेदनासाठी पाठविण्यात आला.