MPSC Exam Postponed : युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी केला राज्य सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 08:00 PM2021-03-11T20:00:02+5:302021-03-11T20:02:07+5:30
एमपीएससीची परीक्षा अचानक रद्द केल्याने प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.
संगमनेर : एमपीएससीची परीक्षा अचानक रद्द केल्याने प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. एमपीएससीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय एमपीएससी मंडळाने अचानक घेतला असल्याचे या निर्णयाचा जाहीर निषेध करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रद्रेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी एमपीएससीच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. तांबे म्हणाले, कोरोनाचे संकट मोठे आहे. हे मान्य आहे. तरी सुद्धा अचानक असा निर्णय घेणे म्हणजे ज्यांनी परीक्षेची तयारी केली आहे. त्यांना अडचणीत टाकण्यासारखे आहे. राज्य शासनाने यात तातडीने लक्ष घालून या निर्णयाचा फेरविचार करावा. बेरोजगारीमुळे अनेक जण परेशान आहेत. अनेकांनी गावापासून, घरापासून दूर राहून अनेक वर्षे, महिने एमपीएससी, युपीएससी याबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी केली आहे. त्यामुळे अचानक परीक्षा रद्द करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध करतो.