यात्रा, उत्सव रद्द करून युवकांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:36+5:302021-05-20T04:22:36+5:30

ग्रामदैवत बिरोबा महाराजांचा यात्रोत्सव रद्द करून रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी प्लाझ्मा दिला. सौरभ जपकर ...

Youths donated blood by canceling yatras and festivals | यात्रा, उत्सव रद्द करून युवकांनी केले रक्तदान

यात्रा, उत्सव रद्द करून युवकांनी केले रक्तदान

ग्रामदैवत बिरोबा महाराजांचा यात्रोत्सव रद्द करून रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी प्लाझ्मा दिला.

सौरभ जपकर मित्रमंडळाच्या वतीने या उपक्रमासाठी पुढाकार घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. अक्षय कर्डिले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार निलेश लंके युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय औटी, सरपंच मनोज कोकाटे, प्रतीक कोतकर, सुरज शेळके, बलभीम कर्डिले, रघुनाथ होळकर, बंडू गुरुजी, गौरव नरवडे, सिद्धांत आंधळे, शिवाजी होळकर, सोमनाथ जपकर, सौरभ जपकर, सुभाष जपकर, राहुल कांडेकर, नितीन कदम, ऋषी खामकर, नितीन जपकर, लहू जपकर, बंडू जपकर, आनंद मांढरे, बाबू गोड, सुरज खताडे आदी उपस्थित होते. सर्व संकटांत असताना उत्सव साजरा न करता रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवून नेप्तीच्या युवकांनी एक आदर्श समाजापुढे ठेवला असल्याची भावना कर्डिले यांनी व्यक्त केली.

फोटो - १९ शिबिर

ओळी- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नगर तालुक्यातील नेप्ती ग्रामस्थांनी

ग्रामदैवत बिरोबा महाराजांचा यात्रोत्सव रद्द करून रक्तदान शिबिर घेण्यात आले.

Web Title: Youths donated blood by canceling yatras and festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.