समता पतसंस्थेच्या जडणघडणीत झंवर यांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:19 AM2020-12-22T04:19:56+5:302020-12-22T04:19:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : राज्यातील पतसंस्था चळवळ स्व. मोहनलाल झंवर यांनी आदर्श बनविली आहे. त्यांनी केलेल्या आदर्शवत मार्गावरून ...

Zanwar's contribution to the formation of Samata Patsanstha | समता पतसंस्थेच्या जडणघडणीत झंवर यांचे योगदान

समता पतसंस्थेच्या जडणघडणीत झंवर यांचे योगदान

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : राज्यातील पतसंस्था चळवळ स्व. मोहनलाल झंवर यांनी आदर्श बनविली आहे. त्यांनी केलेल्या आदर्शवत मार्गावरून समता पतसंस्थेचे मार्गक्रमण झाले आहे. १ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करीत ही पतसंस्था महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था झाली आहे. पतसंस्थेच्या सभागृहाला स्व. झंवर यांचे नाव देऊन त्यांचा उचित गौरव केला आहे, असे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी सांगितले.

कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ सभागृहाला स्व. मोहनलाल झंवर यांचा नामकरण सोहळा रविवारी (दि.२०) झाला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे होते. कोयटे म्हणाले, स्व. मोहनलाल झंवर हे समता पतसंस्थेच्या माध्यमातून व्यापारी, दुकानदारांना न्याय देण्यासाठी नेहमीच आग्रही असायचे. त्यामुळे त्यांच्या स्मृती जतन करून ठेवण्यासाठीच संचालक मंडळाच्या सभागृहाचे नामकरण त्यांचे नावाने करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष किसन भन्साळी, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी कार्यकरी संचालक आर. डी. मंत्री, सुमनबाई झंवर, उद्योजक विजय झंवर, माहेश्वरी समाजाचे विठ्ठल आसावा, अनिष मणियार, दिलीप बजाज, अजय जाजू, संतोष मुंदडा, चेतन भुतडा, रावजी पटेल, अजित लोहाडे, भास्कर आढाव, उद्योजक कैलास ठोळे, समता पतसंस्थेच्या उपाध्यक्षा श्वेता अजमेरे, ज्येष्ठ संचालक गुलाबचंद अग्रवाल, अरविंद पटेल, रामचंद्र बागरेचा, जितू शहा, चांगदेव शिरोडे, संदीप कोयटे, गुलशन होडे, कचरू मोकळ, संचालिका शोभा दरक, समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, समताचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड उपस्थित होते. सूत्रसंचालन पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केले.

Web Title: Zanwar's contribution to the formation of Samata Patsanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.