जिल्हा परिषद सदस्य कांतिलाल घोडके यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:58+5:302021-04-13T04:19:58+5:30

राशीन : कर्जत तालुक्यातील राशीन जिल्हा परिषद गटाचे सदस्य कांतिलाल दादा घोडके (वय ५५) यांचे सोमवारी पहाटे पुण्यातील खासगी ...

Zilla Parishad member Kantilal Ghodke passed away | जिल्हा परिषद सदस्य कांतिलाल घोडके यांचे निधन

जिल्हा परिषद सदस्य कांतिलाल घोडके यांचे निधन

राशीन : कर्जत तालुक्यातील राशीन जिल्हा परिषद गटाचे सदस्य कांतिलाल दादा घोडके (वय ५५) यांचे सोमवारी पहाटे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले, अशी माहिती मुलगा निहाल घोडके यांनी दिली. भारतीय जनता पक्षाकडून ते निवडून आले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दहा दिवसापूर्वी घाेडके यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. घोडके यांचे मूळगाव चिलवडी (ता. कर्जत) आहे. बांधकाम व्यवसायानिमित्त ते पुणे येथे वास्तव्यास होते. मात्र त्यांचे गावात नियमित येणे-जाणे असायचे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना मानणारे होते. जिल्हा परिषद गटाची निवडणूक त्यांनी भाजपकडून लढविली होती. ते पहिल्यांदाच विजयी झाले होते. जिल्हा परिषदेत ते जिल्हा नियोजन समिती व समाजकल्याण समितीचे सदस्य होते.

--

१२ कांतिलाल घोडके

Web Title: Zilla Parishad member Kantilal Ghodke passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.