जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्याचा शिपाई पॉझिटिव्ह, संपर्कातील लोकांची तपासणी,उपाययोजना वाढवल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:55 PM2020-07-16T13:55:13+5:302020-07-16T13:56:03+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा परिषदेतही कोरोनाने शिरकाव केला आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेतील एका प्रमुख पदाधिकाºयाचा शिपाई पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांची तसेच नातेवाईकांची तपासणी होणार आहे.

या कर्मचाºयाच्या कुटुंबीयातील सदस्याचे निधन झाल्याने काही दिवस हा कर्मचारी रजेवर होता. परंतु शुक्रवारपासून हा कर्मचारी कामावर हजर झाला. सोमवारी जिल्हा परिषदेत आल्यानंतर काही वेळातच या कर्मचाºयाचा त्रास होऊ लागल्याने त्याला घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाºयाने कोरोनाची चाचणी करून घेतली.
त्याचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. हा शिपाई ज्या पदाधिकाºयाकडे ड्युटीला आहे, तेथील तिघांना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. संबंधित पदाधिकारी या शिपायाच्या संपर्कात आले की नाही, याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, या घटनेमुळे जिल्हा परिषदेतील कोरोनाच्या उपाययोजना आणखी कडक केल्या आहेत.