शहिदांच्या कुटुुंबियांना जिल्हा परिषद करणार मदत; ग्रामपंचायत विभागाकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी लाखाचा हातभार

By चंद्रकांत शेळके | Published: January 25, 2024 08:19 PM2024-01-25T20:19:40+5:302024-01-25T20:19:50+5:30

जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागामार्फत सेस निधीतून जिल्ह्यातील ३ शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाखाची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Zilla Parishad will help the families of martyrs Contribution of Rs.1 lakh each to three families by the Gram Panchayat Department | शहिदांच्या कुटुुंबियांना जिल्हा परिषद करणार मदत; ग्रामपंचायत विभागाकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी लाखाचा हातभार

शहिदांच्या कुटुुंबियांना जिल्हा परिषद करणार मदत; ग्रामपंचायत विभागाकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी लाखाचा हातभार

चंद्रकांत शेळके 

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागामार्फत सेस निधीतून जिल्ह्यातील ३ शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाखाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. शुक्रवारी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ही मदत संबंधित कुटुंबियांकडे सुपूर्द केली जाईल, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली.

सेस निधीतून विविध योजना किंवा धोरणात्मक कामासाठी जिल्हा परिषद खर्च करते. देशसेवेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांची काळजी घेणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. याच सामाजिक दायित्तातून जिल्हा परिषद सेसमधून ही मदत करण्याची संधी मिळाल्याची भावना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केली.

यात वीरपत्नी शितल संतोष जगदाळे (भोयरे गांगर्डा, ता. पारनेर), वीरपत्नी अंबिका नारायण भोंदे (पिंपळगाव माळवी, ता. नगर) व वीरमाता लताबाई आजिनाथ मेहेत्रे (मिरजगाव, ता. कर्जत) यांना प्रत्येकी १ लाखाची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या काष्टी ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश पंढरीनाथ कोकाटे यांच्या पत्नी माधुरी कोकाटे यांना ५० लाखांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ही मदत संबंधितांना देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, सीईओ आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, राहुल शेळके यांनी या कार्यक्रमाचे हे नियोजन केले आहे.

Web Title: Zilla Parishad will help the families of martyrs Contribution of Rs.1 lakh each to three families by the Gram Panchayat Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.