खरिपाची लगबग

By Admin | Published: May 21, 2014 12:27 AM2014-05-21T00:27:20+5:302024-10-15T05:48:59+5:30

अहमदनगर : मे महिन्यात खर्‍या अर्थाने उन्हाळा जाणवत आहे. १५ तारखेनंतर जिल्ह्याच्या हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली

Zip | खरिपाची लगबग

खरिपाची लगबग

अहमदनगर : मे महिन्यात खर्‍या अर्थाने उन्हाळा जाणवत आहे. १५ तारखेनंतर जिल्ह्याच्या हवामानात बदल झालेला दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याच्या बातम्यांमुळे शेतकरी सुखावला असून खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन घटल्याने यंदा या पिकाच्या बियाणांचा तुटवडा जाणवणार आहे. कृषी विभागाने खरिपाची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात यंदा खरिपासाठी ४ लाख ८२ हजार क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी ६२ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. जिल्ह्यासाठी २ लाख ५ हजार मेट्रिक टन रासायनीक खते मंजूर करण्यात आले असून त्यापैकी ३६ हजार मेट्रीक टन खतांचा पुरवठा झालेला आहे. यंदाच्या हंगामात सर्वात मोठा प्रश्न सोयाबीन पिकाचा आहे. गत वर्षी या पिकाचे उत्पादन घटल्याने यंदा बियाणांचा तुटवडा जाणवत आहे. कृषी विभाग सोयाबीनचे जास्तीतजास्त बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात सोयाबीनेच सरासरी क्षेत्र ६० हजार क्षेत्र असून त्यासाठी ४० हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यापैकी कृषी विभागाकडे विविध कंपन्यांकडून १६ हजार क्विंटल आणि शेतकर्‍यांकडून ५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे. कृषी विभाग जास्तीतजास्त २२ हजार क्विंटल पर्यंत बियाणे उपलब्ध करू शकतो. मात्र, उर्वरित १३ हजार क्टिंलचा प्रश्न कायम राहणार आहे. त्यात कपाशी पिकाचे क्षेत्र कमी झाल्यास शेतकरी सोयाबीनकडे वळणार आहेत. दरम्यान, चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेतकर्‍यांनी मशागतीच्या कामाला सुरूवात केली आहे. येत्या २५ तारखेला रोहिणी नक्षत्र सुरू होणार असल्याने शेतकर्‍यांची धावपळ सुरू होणार आहे. (प्रतिनिधी) कपाशी बियाण्याची ४ लाख ८० हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ५० हजार पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. यात महिको कनक या लोकप्रिय वाणाच्या १ लाख ९० हजार पाकिटांचा समावेश राहणार आहे. पीक निहाय प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये) भात १२ हजार ५००, बाजरी १ लाख ७० हजार, नागली २ हजार ७००, मका ५२ हजार हेक्टर, तृणधान्य २ हजार १००, तूर १२ हजार १००, मुग १५ हजार २००, उडीद ५ हजार ५००, भूईमूग ४ हजार ६००, खुरसणी २ हजार २००, तीळ ५०० , सुर्यफुल ४ हजार २००, सोयाबीन ६० हजार, कापूस १ लाख ३० हजार, आणि ऊस १ लाख १४ हजार २००.

Web Title: Zip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.