राष्ट्रवादी प्रणित मंडळाच्या १२ जागा बिनविरोध

By admin | Published: August 2, 2016 11:51 PM2016-08-02T23:51:43+5:302016-08-03T00:15:41+5:30

शेवगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी प्रणित मंडळाने शेवगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या १७ जागांपैकी १२ जागा

12 seats unanimously elected by the Nationalist Congress Party | राष्ट्रवादी प्रणित मंडळाच्या १२ जागा बिनविरोध

राष्ट्रवादी प्रणित मंडळाच्या १२ जागा बिनविरोध

Next


शेवगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी प्रणित मंडळाने शेवगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या १७ जागांपैकी १२ जागा बिनविरोध पटकावून संघावर आपले वर्चस्व कायम राखले.
मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संचालक मंडळाच्या अ वर्ग संस्था प्रतिनिधींच्या १० तसेच महिला प्रतिनिधींच्या २ अशा १२ जागांची निवडणूक बिनविरोध झाली. ब वर्ग वैयक्तिक मतदार संघाच्या २ जागांसाठी ६, अनुसूचित जाती जमाती, भटक्या,जाती, जमाती व इतर मागासवर्गीय प्रतिनिधींच्या प्रत्येकी एका जागेसाठी २ अशा एकूण जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
१७ जागांसाठी ८४ उमेदवारी अर्ज दाखल होते. अ वर्ग सहकारी संस्था प्रतिनिधींच्या १० जागांसाठी २४ अर्ज दाखल होते. त्यापैकी जगन्नाथ भाऊराव मडके, हनुमान बापूराव पातकळ, एकनाथ दिनकर कसाळ, राजेंद्र सुखदेव वाणी, बाळासाहेब नागोराव विघ्ने, शहादेव बाबूजी खोसे, बाळासाहेब मुरलीधर जाधव, बाळासाहेब उर्फ तुकाराम शिवराम वडघने, चंद्रकांत रायभान निकम, भक्तराज रामकिसन तिडके अशा १० जणांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
उर्वरित १४ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. महिला प्रतिनिधींच्या २ जागांसाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सुवर्णा भारत कातकडे, लिलाबाई बाबासाहेब काळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. इतर तिघांनी अर्ज मागे घेतले.
ब वर्ग व्यक्तिश: प्रतिनिधींच्या २ जागांसाठी विक्रमी ३० अर्ज दाखल होते. त्यापैकी २४ जणांनी माघार घेतली. आता शफिक गुलाब सय्यद, विकास बारीकराव घोरतळे (राष्ट्रवादी), हरिभाऊ बाबूराव बाबर, नारायण बाजीराव टेकाळे (काँग्रेस), राम दत्तात्रय पोटफोडे (कम्युनिस्ट), अविनाश दिगंबर देशमुख (अपक्ष) अशा ६ जणांमध्ये लढत आहे.
अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी माणिक कचरू गायकवाड (राष्ट्रवादी), रवींद्र विलासराव तुजारे (काँग्रेस), भटक्या विमुक्त जाती जमातीच्या एका जागेसाठी माणिकराव अप्पासाहेब निर्मळ (राष्ट्रवादी), रावसाहेब विश्वनाथ ढाकणे (अपक्ष), इतर मागासवर्गीय प्रतिनिधींच्या एका जागेसाठी अशोक निवृत्ती तानवडे (राष्ट्रवादी), संजय भगवान नांगरे (कम्युनिस्ट) अशा लढती रंगल्या आहेत.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: 12 seats unanimously elected by the Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.