मुळा पात्रात वाळू तस्करांचा २६ लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2017 04:29 PM2017-04-04T16:29:42+5:302017-04-04T16:29:42+5:30

मुळा नदी पात्रात जिल्हा गुन्हे अन्वेषणच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

26 lacs of sand smugglers seized in the rice fields | मुळा पात्रात वाळू तस्करांचा २६ लाखांचा माल जप्त

मुळा पात्रात वाळू तस्करांचा २६ लाखांचा माल जप्त

Next

आॅनलाईन लोकमत
राहुरी (अहमदनगर), दि़ ४ - मुळा नदी पात्रात जिल्हा गुन्हे अन्वेषणच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राहुरी ते बारागाव नांदूर या शिवरस्त्यालगत डिग्रस नदी पात्रात अचानक टाकलेल्या छाप्यामुळे वाळू उचलेगिरी करणाऱ्यांची धावपळ उडाली.
पोलीस निरीक्षक दिलीप पवार, विष्णू घोडेचोर, सुनील गायकवाड, प्रमोद जाधव, संदीप पवार, देविदास काळे यांच्या पथकाने मुळा नदी पात्रामध्ये अचानक छापा टाकला़ वाळू उचलेगिरी करणाऱ्यांनी नदी पात्रातून पळ काढण्यात यश मिळविले़ पोलिसांच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करीत दोन डंपर, एक ट्रॅक्टर, दोन दुचाक्या मिळून २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़
राहुरी पोलीस ठाण्यात मनोहर गोसावी यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संजय पाटोळे (रा. विळद), मुज्जफर शेख (रा. बारागाव नांदूर), अप्पासाहेब शिरसाट (रा.राहुरी) व बाळासाहेब मगरे यांच्याविरुध्द वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास कल्लू चव्हाण करीत आहेत़
मुळा नदीचे पात्र वाळूउपशामुळे दहा ते पंधरा फूट खाली गेले आहे़ त्यामुळे मुळा नदी काठावर असलेल्या विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. नदी पात्रातून पाणी वाहून गेले़ याशिवाय बंधारेही भरण्यात आले़ मात्र बऱ्या विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेलेली आहे़ वाळूउपशामुळे नदी पात्राची रुंदी वाढत असल्याचे आढळून आले आहे़

Web Title: 26 lacs of sand smugglers seized in the rice fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.