२९ पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By admin | Published: August 25, 2016 11:34 PM2016-08-25T23:34:15+5:302016-08-25T23:37:37+5:30

श्रीगोंदा : कुकडी कालव्यावरील जोड कालवा १३२ किलोमीटरवरील २९ सहकारी पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ सामूहिक राजीनामे दिले आहेत.

29 Water Use Organizations resigns | २९ पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

२९ पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Next

श्रीगोंदा : कुकडी कालव्यावरील जोड कालवा १३२ किलोमीटरवरील २९ सहकारी पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ सामूहिक राजीनामे दिले आहेत. सर्व पाणी पुरवठा संस्था विसर्जित करवून शासनाने त्या ताब्यात घ्याव्यात अशी मागणीही या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
राजीनामे दिलेल्या पाणी वापर संस्था- मेघगंगा पाणी वापर सहकारी संस्था लोणी व्यंकनाथ, भवानी पाणी वापर संस्था लोणी व्यंकनाथ, कपिला पाणी वापर सहकारी संस्था मढेवडगाव, स्वामीकृपा पाणी वापर सहकारी संस्था लोणी व्यंकनाथ, सिद्धेश्वर पाणी वापर सहकारी संस्था, शिरसगाव, संगम पाणी वापर सहकारी संस्था बाबुर्डी, हुतात्मा पाणी वापर सहकारी संस्था बाबुर्र्डी, नाथ कृपा पाणी वापर सहकारी संस्था म्हातारपिंप्री, प्रियदर्शनी पाणी वापर सहकारी संस्था लोणी व्यंकनाथ, बळीराजा पाणी वापर सहकारी संस्था लिंपणगाव, श्री किसान पाणी वापर सहकारी संस्था, लिंपणगाव, बिरोबा पाणी वापर सहकारी संस्था वेळू, गारपीर पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, ज्योतिबा पाणी वापर सहकारी संस्था चोराचीवाडी, सद्गुरु पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, शिवनेरी पाणी वापर सहकारी संस्था पेडगाव, साळवणदेवी पाणी वापर सहकारी संस्था, महंमद महाराज पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, साळूआई पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, फुले-शाहू पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, खंडेश्वर पाणी वापर सहकारी संस्था पारगाव सुद्रिक, शिवशक्ती पाणी वापर सहकारी संस्था पारगाव सुद्रिक, महात्मा फुले पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा, श्रमिक पाणी वापर सहकारी संस्था, विनायक पाणी वापर सहकारी संस्था श्रीगोंदा. या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे यांच्याकडे सामूहिक राजीनामे सुपूर्द केले आहेत. तसेच सर्व पाणी पुरवठा संस्था विसर्जित करुन शासनाने ताब्यात घेण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे. पाणी वापर संस्थांच्या मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ या संस्थांच्या पदाधिकारी राजीनामे दिल्याचे सांगण्यात येते़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 29 Water Use Organizations resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.