कत्तलीसाठी चाललेल्या ३४ जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:15 PM2019-05-10T12:15:49+5:302019-05-10T12:16:56+5:30

दोन टेम्पोमधून कत्तलीसाठी चाललेल्या ३४ जनावरांची सुटका शिंगणापूर पोलिसांनी केली. यावेळी दोन टेम्पो, एका कारसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 34 rescued animals for slaughter | कत्तलीसाठी चाललेल्या ३४ जनावरांची सुटका

कत्तलीसाठी चाललेल्या ३४ जनावरांची सुटका

Next

सोनई : दोन टेम्पोमधून कत्तलीसाठी चाललेल्या ३४ जनावरांची सुटका शिंगणापूर पोलिसांनी केली. यावेळी दोन टेम्पो, एका कारसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रस्तापूर (ता.नेवासा) शिवारात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे दोन टेम्पो असल्याची माहिती शिंगणापूर पोलिसांना दूरध्वनीवरून समजली होती. या माहितीच्या आधारे शिंगणापूर पोलिसांनी ६ मे रोजी सायंकाळी रस्तापूर शिवारातून चाललेले एम. एच. ०६ ए. क्यू. ४७३५, एम. एच. ४३ एफ ४१४ या क्रमांकाचे दोन टेम्पो पोलिसांनी थांबविले. त्यांची पाहणी केली. टेम्पोमध्ये तब्बल ३४ जनावरे आढळून आली. त्यांच्या बरोबर एम. एच. ०१ ए. व्ही. ९५७५ क्रमांकाची कारही आढळून आली. मोहमंद अत्तार, मोशीन मुनाफ शेख,महमंद अफसर महंमद अकबर कुरेशी, शाकीर कुरेशी हे सर्व राहणार मंगळवार पेठ, जुन्नर यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत ५(अ)(१), ५(ब),९(ब) व प्राण्यास निर्दयपणे वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ३,११ फिर्याद नोंदविण्यात आली आहे. आठ गावरान गायी, दोन गिर जातीच्या गायी, सात जर्सी गायी, पाच बैल, एक गिर जातीचा बैल व अकरा जर्सी गायीच्या वासरांचा यामध्ये समावेश होता.

Web Title:  34 rescued animals for slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.