अहमदनगरात दोन गटात वाद, काही ठिकाणी दगडफेक, वाहने जाळली; शहरात तणावपूर्ण शांतता

By अण्णा नवथर | Published: April 5, 2023 09:32 AM2023-04-05T09:32:12+5:302023-04-05T09:35:21+5:30

अवघ्या काही क्षणातच या वादाचे तीव्र पडसाद उमटले. जमावाने दोन वाहने जाळली. तर एका वाहनाची तोडफोड केली.

A huge dispute broke out between two groups in Warulwadi village in Ahmednagar on Tuesday night, now there is peace | अहमदनगरात दोन गटात वाद, काही ठिकाणी दगडफेक, वाहने जाळली; शहरात तणावपूर्ण शांतता

अहमदनगरात दोन गटात वाद, काही ठिकाणी दगडफेक, वाहने जाळली; शहरात तणावपूर्ण शांतता

googlenewsNext

अहदनगर: छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गजराजनगर जवळील वारूळवाडी गावात दोन गटात मंगळवारी रात्री  मोठा वाद  झाला. त्यानंतर जमावाने रस्त्यावर उतरून काही ठिकाणी दगडफेक ,तर काही ठिकाणी वाहने जाळण्यात आली. या घटनेमुळे नगर शहर व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान गजराज नगर, मनपा कार्यालय परिसर,  झेंडीगेट, सर्जेपुरा या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश बोला यांनी शांततेची आव्हान केले आहे.

दोन गटात झालेल्या हणामरित सतीश साहेबराव कर्डिले (वय 26 रा. गजराज नगर) ,दीपक सुरेश बंनखीले (वय 22 रा. गजराज नगर ) यांच्यासह सात जण जखमी झाले असून , त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहर व उपनगर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहर व छत्रपती संभाजी नगर महामार्ग लगत असलेल्या वसाहती तसेच शासकीय कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. मिळालेल्या माहितीनुसार, गजराजनगर परिसरात झेंडे लावण्यात आले होते. त्यावरून दोन गटात गटात काहीसा तणाव निर्माण झाला होता. यातूनच मंगळवारी ,रात्री  एका युवकास मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या गटाच्या युवकांना मारहाण  करण्यात आली.

अवघ्या काही क्षणातच या वादाचे तीव्र पडसाद उमटले. जमावाने दोन वाहने जाळली. तर एका वाहनाची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवले. हा वाद  सुरू असतानाच इंद्रायणी हॉटेलजवळ एका युवकास मारहाण करण्यात आली. त्यानंतर काही क्षणातच छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावर  मोठा जमाव जमा झाला होता. या जमावाने महामार्गावरील ट्रक व इतर वाहनांवर दगडफेक केली. त्यानंतर तोफखाना पोलिसांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात झाला.

पोलिस अधीक्षक राकेश ओला स्वतः पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयातही मोठा जमाव जमला होता. सुपा पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी रुग्णालयात दाखल होत जमाव पांगवला. त्यानंतर काही वेळाने पत्रकार चौक  रस्त्यावर जमावणे एकास मारहाण केली. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेची वार्ता संपूर्ण शहरात पसरली शहरातील मध्यवर्ती भागातही ठिकठिकाणी जमाव जमला होता. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मध्यवर्ती शहरासह उपनगरात गस्त घालत नागरिकांना शांततेचे आव्हान केले. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू होते.. त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिराने शहर व परिसरात तील तणाव निवळला.

शहराचं उपनगरातील दुकाने रात्री बंद

दगडफेकीच्या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती शहरातील कापड बाजार चितळे रोड सर्जेपुरा तसेच मनमाड रोडवरील हॉटेल्स दुकान सावेडी उपनगरातील प्रोफेसर चौक कुष्ठधाम रोड गुलमोहर रोड रस्त्यावरील दुकाने व्यावसायिकांनी रात्री बंद केली होती त्यामुळे शहरात कमालीची शांतता पसरली होती.

पोलिसांचे नागरिकांना शांततेचे आवाहन

दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहर व परिसरात शांतता ठेवावी असे आवाहन केले.

पोलिसांकडून धरपकड सुरू

दरम्यान याप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या काही जणांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक चौक ते गजराज नगर या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

Web Title: A huge dispute broke out between two groups in Warulwadi village in Ahmednagar on Tuesday night, now there is peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.