Ahmednagar: क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 07:20 PM2024-07-19T19:20:11+5:302024-07-19T19:20:21+5:30

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने नरेंद्र फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ बडी साजन मंगल कार्यालय येथे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या उपस्थितीत पटावर चाल देऊन करण्यात आला.

Ahmednagar: Inauguration of Classical International Ranking Chess Tournament | Ahmednagar: क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ

Ahmednagar: क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ

- प्रशांत शिंदे
अहमदनगर - अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने नरेंद्र फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ बडी साजन मंगल कार्यालय येथे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या उपस्थितीत पटावर चाल देऊन करण्यात आला.

यावेळी सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त श्याम कांबळे, पारूनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, संजय खडके, सुनील जोशी, दत्ता घाडगे, स्वप्नील भगूरकर, ओंकार बापट, चेतन कड, अनुराधा बापट, डॉ. स्मिता वाघ, शुभदा ठोंबरे, रोहिणी आडकर, पंच प्रवीण ठाकरे, शार्दुल तापसे, यशवंत पवार, अनुपम भट्टाचार्य, अमरीश जोशी, निळकंठ श्रावण, पवन राठी, गायत्री कुलकर्णी, वैभव कुंभलकर, देवेंद्र ढोकळे, देवेंद्र वैद्य, रोहित आडकर आदींसह खेळाडू पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी यशवंत बापट म्हणाले की, या स्पर्धेत गुजरात, आंध्र प्रदेश, दिव, दमन, गोवा, तमिळनाडू, काश्मीर, उत्तर प्रदेश, अंदमान, निकोबार आदी राज्यांतून ५६० च्या वर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून या स्पर्धांचे आयोजन केले आहे. नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, अहमदनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच ५६० खेळाडू भारतातून आलेले आहेत. शहरात बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून दोन स्पर्धा होत. आता नवीन उपक्रम म्हणून ही तिसरी स्पर्धा खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली आहे. पुढचे ग्रँडमास्टर अहमदनगर शहरातूनच होतील, याची खात्री आहे.

Web Title: Ahmednagar: Inauguration of Classical International Ranking Chess Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.